नंदुरबारला रेल्वे बोगींमध्ये कोवीड सेंटर
Nandurbar, covid center ,Railway
नंदुरबार जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने खासदार डॉ हिना गावित यांनी कोविड रेल्वेची मागणी केंद्राकडे केली होती. ती मागणी मान्य करत कोरोना बाधित रुग्णांसाठी आयसोलेशन सेंटर म्हणून रेल्वेच्या बोगींचा वापर करण्यात आली आहे. ३१ बोगींमध्ये सहाशे बेडची सोय करण्यात आली आहे. 22 डॉक्टरांची टीम इथे उपचार करणार आहे. प्रत्येक बोगीत किमान दोन ऑक्सिजन बेडची सुविधा करण्यात आली आहे.
नंदुरबार रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर 3 वर 'कोविड रेल्वे' आरोग्य सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.