नाना पटोले यांची महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी निवड

Update: 2021-02-05 13:23 GMT

थेट मोदींशी पंगा घेणारा नेता अशी ओळख असलेल्या नाना पटोले (nana patole) यांच्याकडे महाराष्ट्र कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाची (president of Maharashtra Congress) सूत्र देण्यात आली आहेत. नाना पटोले यांनी थेट मोदींशी (Narendra Modi) पंगा घेत खासदारकीचा राजीनामा देत थेट कॉंग्रेस मध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर झालेल्या साकोली विधानसभा मतदारसंघातून ते आमदार म्हणून निवडून आले.

राज्यात स्थापन झालेल्या महाविकास आघाडी सरकारमुळे (MVA) राज्यातील राजकीय गणितं बदलली. नाना पटोले विधानसभा अध्यक्ष झाले. मात्र, स्वभावाने आक्रमक असलेल्या नाना पटोले यांचं मन अध्यक्षाच्या खुर्चीवर जास्त दिवस रमलं नाही. विधानसभेचं अध्यक्ष पद घेण्यापुर्वीही त्यांनी प्रदेशाध्यक्षपदा बाबत बोलून दाखवले होते. मात्र, त्यावेळी हायकमांडच्या आदेशामुळे त्यांना विधानसभा अध्यक्ष पद घ्यावं लागलं होतं.

अलिकडे राज्यात कॉंग्रेसमधील नेतृत्व बदलांची चर्चा सुरु झाल्यानंतर नाना पटोले यांचं नाव आघाडीवर होतं. त्यावर कॉंग्रेस हायकमांडने शिक्कामोर्तब केल्यानंतर नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन आता कॉंग्रेस अध्यक्ष पदाची सूत्र हातात घेतली आहेत.

कोण आहेत नाना पटोले? (Who is Nana Patole)

नाना पटोले हे साकोली मतदार संघाचे आमदार आहेत.

शेतकरी नेते अशी त्यांची ओळख असून त्यांचा शेती संदर्भात गाढा अभ्यास आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींशी शेतकऱ्यांसाठी पंगा घेणारा नेता अशी ओळख

कॉंग्रेसमधील आक्रमक नेता म्हणून ओळख

Tags:    

Similar News