महापुरूषांची बदनामी करून चर्चेत राहणाऱ्या मनोहर भिडे याच्या नावाबाबत राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी मोठं वक्तव्य केलंय. भुजबळ म्हणाले, “ ब्राह्मण समाजानं वाईट वाटून घेऊ नये. मात्र, ब्राह्मण समाजात संभाजी, शिवाजी नावं ठेवत नाहीत, मात्र, मुद्दामहून संभाजी भिडे असं नाव ठेवण्यात आल्याचं वक्तव्य भुजबळांनी केलंय.
संभाजी भिडे यांचं खरं नाव मनोहर कुलकर्णी आहे. लोकांमध्ये संभ्रम निर्माण केला जातो. खरं तर ब्राह्मण समाजानं वाईट वाटून घेऊ नये. मात्र, ब्राह्मण समाजात संभाजी, शिवाजी अशी नाव ठेवत नाहीत. पण मुद्दामहून संभाजी भिडे हे नाव ठेवण्यात आल्याची टीका भुजबळांनी केलीय.
काही लोकांना सरस्वती तर काहींना शारदा आवडते. मात्र, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्राबाई फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील या महापुरुषांनी आमच्यासाठी शिक्षणाची दारे खुली केली असल्याचं भुजबळ यावेळी म्हणाले. सध्या राजकीय बदलावरही भुजबळांनी यावेळी भाष्य केलं. ते म्हणाले, “ काही लोकं मला म्हणतात, तुम्ही इकडे गेलात-तिकडे गेलात...मात्र, मी कुठेही गेलो तरी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा वारसा सोडणार नसल्याचंही भुजबळांनी स्पष्ट केलं.
मनोहर भिडे ऊर्फ संभाजी भिडे याच्यावर छगन भुजबळांनी जोरदार टीका केलीय. इतिहास मोडणाऱ्यांविरोधात आपल्याला उभं राहावं लागेल. जोपर्यंत आपला इतिहास माहिती होणार नाही, तोपर्यंत आपण भविष्याकडे बघू शकत नाही. राज्यक्रांतीकारकांपासून ते समाजक्रांतीकारकांपर्यंत आपल्याला वारसा आहे. महात्मा फुलेंनी सांगितलंय, सत्तेविना सर्व कळा झाल्या अवकळा. सत्ता असेल तर तुम्ही समाजासाठी पाहिजे ते करू शकता, असंही भुजबळांनी सांगितलं.