पुढील पाच दिवसातील विदर्भातील हवामानाचा अंदाज नागपूर हवामान विभागाने वर्तवला आहे. यानुसार २८ एप्रिल रोजी गडचिरोली चंद्रपूर जिल्ह्यातील तुरळक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी कोसळतील तसेच २९ एप्रिल रोजी गडचिरोली चंद्रपूर गोंदिया भंडारा या जिल्ह्यांतील तुरळक भागात हलक्या स्वरूपात पाऊस पडेल.
१ मे रोजी गडचिरोली चंद्रपूर गोंदिया येथील एक दोन ठिकाणी गारपीट होण्याची देखील शक्यता आहे. याचबरोबर नागपूर आणि वर्धा जिल्ह्यात देखील काही ठिकाणी हलक्या तसेच मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. २ मे या दिवशी अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा वाशीम या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम आणि एक दोन ठिकाणी विजेच्या कडकडाटासह मेघगर्जनेसह शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
हवामान विभागाने वर्तविलेले अंदाज पुढीलप्रमाणे