Nagpur Rain : नागपूरमध्ये मुसळधार, अंबाझरी तलावाचे पाणी थेट नागरिकांच्या घरात

नागपूर शहरात रात्रभर झाला. त्यामुळे अंबाझरी तलाव फुटल्याने नागरी वस्तीत पाणी शिरल्याची चर्चा रंगली होती. त्यावर महापालिकेने स्पष्टीकरण दिले आहे.

Update: 2023-09-23 03:52 GMT

नागपूर शहरात रात्रभर मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे अंबाझरी तलाव फुटून नागरी वस्त्यांमध्ये पाणी शिरल्याचे म्हटले जात होते. मात्र महापालिकेने अंबाझरी तलाव फुटल्याची चर्चा फेटाळून लावली आहे.

शुक्रवारी रात्रभर नागपूर शहरात पाऊस होता. त्यातच मध्यरात्रीनंतर पावसाची तीव्रता वाढली. त्यामुळे अंबाझरी तलाव ओव्हर फ्लो झाला. त्यामुळे विसर्ग पॉईंटच्या जवळच्या नागरी वस्तीत तलावाचे पाणी शिरले. त्यामुळे तलाव फुटल्याची चर्चा रंगली होती.

यावेळी घरात पाणी शिरल्याने नागरिकांनी आपल्या मुलाबाळांना दुसऱ्या मजल्यावर हलविले. त्यानंतर त्यांनी महापालिकेशी संपर्क साधला. यावेळी महापालिकेची यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली आणि यावेळी त्यांनी अंबाझरी तलाव फुटल्याची चर्चा फेटाळून लावली. मात्र अंबाझरी तलाव ओव्हर फ्लो झाल्याने नागरी वस्तीत पाणी शिरले आहे. त्याचे व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहेत. मात्र महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी मदतकार्य करीत आहेत. त्यांनी आपत्कालिन व्यवस्थापन कक्ष स्थापन करून 0712-2567029, 0712-2567777, तसेच 0712-2540299, 0712-2540188, 101, 108, 7030972200 या अग्निशमन केंद्राला संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

Tags:    

Similar News