लालबागच्या राजाला माझा अखेरचा नमस्कार – नितीन देसाईंची ऑडिओ क्लिप

Update: 2023-08-03 10:55 GMT

कला विश्वातील एक मोठा कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई (वय ५७) यांनी त्यांच्या कर्जत येथील एन डी स्टुडिओ ( N D Studio ) मध्येच आत्महत्या करत आपला प्रवास थांबवला. या घटनेनंतर चित्रपटसृष्टी हळहळली.

मुंबईतल्या जेजे रुग्णालयात (JJ Hospital ) त्यांच्या पार्थिवाचं शवविच्छेदन करण्यात आलं. एनडी स्टुडिओ मध्येच त्यांच्या पार्थिवावर शुक्रवारी (दि. ४ ऑगस्ट) अंत्यसंस्कार होणार आहेत. कर्जाबाजारीपणामुळं त्यांनी आत्महत्या केल्याचं प्राथमिक कारण सांगितलं जातंय. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी ११ ऑडिओ क्लिप रेकॉर्ड केल्या होत्या. आणि ते त्यांनी त्यांच्या बहिणीकडे सोपवण्याची जबाबदारी सांगितले होते. त्यात पहिल्या ऑडिओ क्लिप मधे पहिलीच ओळ "लालबागच्या राजाला माझा अखेरचा नमस्कार असे होते..."

नितीन देसाई दरवर्षी मुंबईतील 'लालबाग चा राजा गणपतीसाठी आकर्षक देखावा उभारायचे. गेल्या वर्षी देखील त्यांनीच राममंदिराचा सुंदर असा देखावा उभारला होता. गेल्या महिन्यापासूनच त्यांनी लालबागच्या राजासाठी देखावा उभारण्याचे काम सुरू केले होते. यावर्षी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा देखावा उभारण्याची योजना आखली होती. पण, नितीन देसाई यांच्या अकाली जाण्याने लालबागच्या राजाच्या देखाव्याचे काम अपूरे राहिले आहे. गणपतीच्या आगमनाला फक्त ४५ दिवस उरले आहेत. अशा स्थितीत या सेटचे काम कोण आणि कसे पूर्ण होणार, हा प्रश्न 'लालबाग चा राजा'च्या मंडळासमोर आहे.

Tags:    

Similar News