मेट्रोच्या उद्घाटनासाठी देवेंद्र फडणवीसांना सरकारने टाळले, सुब्रमण्यम स्वामींना निमंत्रण
मुंबई : राज्यात शिवसेना विरुद्ध भाजप संघर्ष अत्यंत तीव्र वळणावर पोहोचला असताना आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना मोठा धक्का दिला आहे. मुंबईत मेट्रो २ अ आणि मेट्रो ७ चे उद्घाटन गुढी पाडवाच्या मुहूर्तावर होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते हे उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमासाठी अनेक मान्यवरांना निमंत्रण देण्यात आले आहे. आश्चर्याची बाब म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणांवर टीका करणाऱ्या सुब्रमण्यम स्वामी यांना विशेष निमंत्रण देण्यात आले आहे. पण राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना या कार्यक्रमाला बोलावण्यात आलेले नाही.
पण निमंत्रितांमध्ये विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, यांच्यासह भाजपच्या इतर काही आमदारांना बोलावण्यात आले आहे. खासदार गोपाळ शेट्टी यांनाही निमंत्रण देण्यात आले आहे. पण मात्र विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना मात्र निमंत्रण देण्यात आलेले नाही. याच दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट केले आहे. "आम्ही जे काम अतिशय गतीनं सुरू केलं, त्या दोन मेट्रो मार्गांचे काम पूर्ण होतेय, ही आनंदाची बाब. मेट्रो-3 चे सुद्धा 80% काम झाले, केवळ कारशेड नसल्याने ती 4 वर्ष सुरू होऊ शकत नाही. आरेमध्ये ते झाले, तर 9 महिन्यात ती मेट्रो धावेल. सरकारने पुढाकार घ्यावा!" असे ट्विट त्यांनी केले आहे.
आम्ही जे काम अतिशय गतीनं सुरू केलं,
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) April 1, 2022
त्या दोन मेट्रो मार्गांचे काम पूर्ण होतेय, ही आनंदाची बाब.
मेट्रो-3 चे सुद्धा 80% काम झाले,
केवळ कारशेड नसल्याने ती 4 वर्ष सुरू होऊ शकत नाही. आरेमध्ये ते झाले, तर 9 महिन्यात ती मेट्रो धावेल.
सरकारने पुढाकार घ्यावा!
नागपूर माध्यमांशी संवाद.