आज राष्ट्रवादी कॉंग्रेसचा वर्धापन दिन त्यानिमित्ताने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी पवार यांनी या देशानं अनेक पक्ष पाहिले, काही टिकले. पण राष्ट्रवादीचं हे वैशिष्ट्य आहे 22 वर्ष शक्ती वाढवण्यासाठी प्रयत्न केले. सत्तेत आपण होतो, सत्ता गेल्यावर काही लोक गेले. पण नवीन लोक तयार झाले. नवीन नेतृत्व पुढं आलं. असं म्हणत पवार यांनी कोरोना च्या लढ्यात महाराष्ट्राच्या आरोग्य खात्याचं नेतृत्व करणाऱ्या राजेश टोपे यांचं कौतुक केलं आहे.
यावेळी पवार यांनी शिवसेनेसोबत सरकार स्थापन केल्यानंतर सरकारच्या वाटचाली बाबत आणि महाविकास आघाडीच्या पुढील भूमिकांबाबत पहिल्यांदाच भाष्य केलं.
यावेळी पवार यांनी पुढील निवडणूका महाविकास आघाडी एकत्रित लढतील अशी घोषणा केली आहे.
सरकार पडण्याबद्दल अनेकांनी आडाखे बांधले आहेत. पण मला एवढचं सांगायचं आहे की, हे सरकार टिकेल. पुढची 5 वर्षं काम करेल. हे सरकार नुसतं 5 वर्षं नाही तर उद्याच्या लोकसभा आणि विधानसभेला अधिक जोमानं एकत्र काम करून सामान्य जनतेचं प्रभावीपणानं देशात आणि राज्यात प्रतिनिधित्व करेल, याबद्दल माझ्या मनात शंका नाही.
असं पवार यांनी म्हटलं आहे...
शिवसेनेवर विश्वास...
शिवसेना आणि आपण एकत्र का आलो? पर्याय समोर आला आणि तो लोकांनी स्वीकारला. शिवसेनेबरोबर आपण कधी काम केलं नाही पण महाराष्ट्र गेले अनेक वर्ष शिवसेनेला जाणतो आहे. असं म्हणत शरद पवार यांनी आगामी काळात महाविकास आघाडी सरकार एकत्रित निवडणुका लढण्याचं सुतोवाच केलं आहे.
काय म्हटलंय पवारांनी...
शिवसेनेसोबत आपण कधी काम केलं नाही पण महाराष्ट्र शिवसेनेलासुद्धा कित्येक वर्षांपासून पाहत आहे. माझा यासंबंधीचा अनुभव विश्वास असणाराच आहे. ज्यावेळी जनता पक्षाचं राज्य आलं त्यानंतरच्या कालखंडात निवडणुकीत सगळीकडे काँग्रेसचा पराभव झाला असताना काँग्रेसला पाठिंबा देण्यासाठी एक राजकीय पक्ष पुढे आला….तो म्हणजे शिवसेना. नुसते पुढे आले नाहीत तर इंदिरा गांधींना मदत करण्यासाठी शिवसेना एकही उमेदवार विधानसभा निवडणुकीत उभा करणार नाही असा निर्णय घेतला. पक्षाचा नेता असा निर्णय घेतो तुम्ही विचार करा. पण त्याची चिंता कधी बाळासाहेबांनी केली नाही. त्यांनी इंदिरा गांधींना दिलेला शब्द निवडणूक न लढवत पाळला. त्यामुळे कोणी काहीही शंका घेतली तरी शिवेसनेने ज्या पद्दतीने त्या कालखंडात भक्कमपणाची भूमिका घेतली तीच भूमिका सोडण्यासंबंधी कोणी सांगत असेल तर तसं होणार नाही. असं म्हणत भाजपवर निशाणा साधला आहे.
पाहा काय म्हटलंय पवारांनी...