कोरोनाच्या संकटाने सगळ्यांची चिंता वाढली असताना मुंबईकरांसाठी सलग दुसऱ्या दिवशी दिलासादायक बातमी आली आहे. मुंबईत गेल्या 24 तासात कोरोनाचे नवीन रुग्ण घटले आहे. रविवारी 5 हजार 542 रुग्ण आढळले आहेत. तर आणखी एक दिलासादायक बातमी म्हणजे कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 8 हजार 478 एवढी झाली आहे. तर 24 तासात 64 जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत रुग्ण कोरोनामुक्त होण्याचा दर 86 टक्के आहे. तर रुग्ण दुपटीचा दर 58 दिवसांपर्यंत गेला आहे. तर 18 एप्रिल ते 24 एप्रिल या काळात कोरोनाचे रुग्ण वाढीचा दर 1.17 टक्के एवढा झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईत 10 हजारांच्या वर रुग्ण आढळत होते. पण गेल्या दोन दिवसांपासून रुग्णसंख्या जवळपास निम्म्याने कमी झाली आहे.