मुंबईचा गणेशोत्सव हा जगभर प्रसिध्द आहे. परंतू भाविकांना यावर्षी मंडळांमध्ये जाउन आपल्या लाडक्या बाप्पाचे दर्शन घेता येणार नाही आहे. मुंबई पोलिसांनी शहरात कलम १४४ लागू केली आहे.
कोव्हिड १९ चे संक्रमण अद्यापही संपलेले नाही. परंतू राज्यातील बहुतेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. शासनाच्या माहितीनुसार कोव्हिड १९ च्या तिसऱ्या लाटेचा धोका आहे. याच पार्श्वभुमीवर मुंबई पोलिसांनी शहरात कलम १४४ लागू केले आहे. यानुसार सर्व सार्वजनिक मंडळांमध्ये प्रत्यक्ष मुखदर्शन बंदी केली आहे. मुंबई पोलिसांनी शहरातील सर्व सार्वजनिक मंडळांना ऑनलाईन डिजीटल दर्शनाची सुविधा भाविकांसाठी उपलब्ध करण्याचे आदेश दिले आहेत.
या आदेशांनुसार गणेशोत्सवाच्या दहा दिवसांच्या काळात कोणत्याही प्रकारची निरवणुक काढता येणार नाहीये. सार्वजनिक मंडळं या निर्णयाचे पालन करतात की नाही हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.