समाजमन दूषित करून जातीय तेढ निर्माण करण्याचे काही समाजकंटकांकडून होणारे प्रयत्न मोडून काढण्याचा चंग मुंबई पोलिसांनी बांधला आहे. चार महिन्यांत एकूण 12,800 सोशल मीडिया पोस्ट हटवल्या आहेत. या अशा पोस्ट आहेत, ज्या समाजात हिंसाचार पसरवू शकतात किंवा लोकांपर्यंत हिंसा पसरवण्याच्या उद्देशाने विशेष माध्यमांवर टाकल्या गेल्या आहेत.
राम जयंती आणि हनुमान जयंतीच्या निमित्ताने राज्यातील आणि देशातील अनेक ठिकाणी जातीय दंगे करण्याचा प्रयत्न झाला आहे. मुंबई शहरातही याच पद्धतीने वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न होता परंतु ते मुंबई पोलिसांच्या सतर्कतेमुळे हा प्रयत्न अपयशी ठरला आहे.
मुंबई पोलिसांच्या विशेष शाखेने जानेवारीत 5 हजार 754, फेब्रुवारीत 4 हजार 252, मार्चमध्ये 3 हजार 958 पोस्ट हटवली आहेत. या अशा पोस्ट आहेत ज्या समाजात हिंसाचार पसरवू शकतात किंवा लोकांपर्यंत हिंसा पसरवण्याच्या उद्देशाने विशेष माध्यमांवर टाकल्या गेल्या आहेत. महाराष्ट्रात शांतता राहावी यासाठी महाराष्ट्र एसआयडीची टीम दररोज 30 ते 35 अशा पोस्ट हटवत असल्याचे महाराष्ट्र पोलिसांनी सांगितले.
कोविडपासून सोशल मीडियावर लोकांची अॅक्टिव्हिटी खूप वाढली आहे, त्यामुळे अशा पोस्टची संख्याही वाढत आहे. सूत्रांनी सांगितले की, राजकीय पक्षांकडून कोणत्याही प्रकारचे वक्तव्य येताच सोशल मीडियावर पोस्टची संख्या वाढू लागते. महाराष्ट्र पोलिस सोशल मीडियावरील सर्व पोस्टवर लक्ष ठेवून आहेत आणि विशेषत: समाजात कोणत्याही प्रकारचा द्वेष निर्माण करू शकतात.
'सोशल मीडिया लॅब' सक्रिय
मुंबई पोलिसांनी सोमवारी सांगितले की, मुंबईत जातीय वाद नियंत्रणात ठेवण्यासाठी सोशल मीडिया लॅब सक्रिय करण्यात आली आहे. यामुळए आता सोशल मीडियाचा वापर करत सामाजित तेढ निर्माण करण्यांना आता चाप बसणार आहे. मुंबई पोलिसांच्या सोशल मीडिया लॅबकडून आक्षेपार्ह पोस्टवर कारवाई करण्यात येतेत. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत जातीय तेढ निर्माण करु शकणाऱ्या सुमारे 3000 पोस्ट डिलीट केल्या आहेत.