मुंबईत महिलेला २२ कोटींच्या ड्रग्जसहित अटक, मुंबई पोलिसांची मोठी कारवाई

Update: 2021-10-20 06:20 GMT
मुंबईत महिलेला २२ कोटींच्या ड्रग्जसहित अटक, मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
  • whatsapp icon

मुंबई मध्ये शीव (sion) भागात मुंबई पोलिसांनी एका ड्रग विक्रेत्या महिलेला अटक केल्याची घटना घडली आहे. अँटी नारकोटिक्स सेल विभागाने या महिलेवर ही कारवाई केल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे. सदर महिलेकडे तब्बल २२ कोटी रूपये किंमतीचे ७ किलो हेरॉईन जप्त करण्यात आले आहे. या महिलेवर NDPS कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती मुंबई पोलीसांनी दिली असल्याचे वृत्त ANI या वृत्तसंस्थेने ट्विट करून दिले आहे. क्रुज ड्रग्ज केस प्रकरणात ८५ ग्रॅम ड्रग्ज मिळाले म्हणुन शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान आणि इतर मुलांवर कारवाई करणारे NCB पथक या महिलेचं प्रकरण हाताळणार का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. 

Tags:    

Similar News