Mumbai Monsoon Update : महाराष्ट्रातील मान्सूनची प्रतिक्षा संपली असून राज्याच्या अनेक भागांमध्ये आज पावसाने हजेरी लावली. आज पुणे आणि मुंबई, कोकणासह सकाळपासून पाऊस सुरू असून वातावरणात गारवा निर्माण झाल्यामुळे उकाड्यापासून मुंबईकरांची सुटका झाली. संध्याकाळी पावसाचा जोर वाढल्याने अनेकांचा खोळंबा झाला. मुंबईतील उपनगाराला या पावसाचा जोरदार फटका बसला. अंधेरी सबवे, एलबीएस मार्ग, साकीनाका ९० फिट रोड, माटुंगा, पश्चिम द्रुतगती मार्ग तसेच महालक्ष्मी, दादर, माहीम, धारावी, परळ, शिव, किंग सर्कल, कुर्ला, चेंबूर, अंधेरी, मुलुंड, दहिसर आदी भागात पाणी साचल्याच दिसून आलं यावर काँग्रेस आमदार वर्षा गायकवाड ( MLA Varsha Gaikwad ) यांनी व्हिडीओ पोस्ट करत मुंबई (Mumbai) पहिल्याच पावसात तुंबली शिंदे-फडणवीस (Eknath Shinde - Devendra Fadnavis) यांच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला
काँग्रेस आमदार वर्षा गायकवाड यांनी मुख्यंमंत्र्याना सोशल मिडीयाच्या माध्यमातून जाब विचारला आहे त्या म्हणाल्या की "मुख्यमंत्री महोदय आम्ही आपणांस यापूर्वीच सांगितलं होतं की, मुंबईत नालेसफाईच्या आणि मान्सूनपूर्व कामांत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार आणि हलगर्जीपणा करण्यात आला आहे. परंतु त्याकडे लक्ष दिलं गेलं नाही. पावसाची पहिली सर आणि मुंबई पहिल्याच पावसात तुंबली आहे. यामुळे सत्ताधाऱ्यांनी मान्सूनपूर्व तयारीचे केलेले सर्व दावे फोल ठरले आहेत. धादांत खोटं बोलणारं हे सरकार आणि यांचे अधिकारी! अंधेरी सबवे, एलबीएस मार्ग, साकीनाका ९० फिट रोड, माटुंगा, पश्चिम द्रुतगती मार्ग तसेच महालक्ष्मी, दादर, माहीम, धारावी, परळ, शिव, किंग सर्कल, कुर्ला, चेंबूर, अंधेरी, मुलुंड, दहिसर आदी ठिकाणच्या सखल भागांत पाणी साचलं आहे. परिणामी, नागरिकांची मोठी गैरसोय होत असून त्यांना पाण्यातून वाट काढावी लागत आहे. त्यांचे प्रचंड हाल होत आहेत. वाहतुकीवरही मोठा परिणाम झाला आहे. सर्वसामान्यांना जो नाहक त्रास सहन करावा लागत आहे याला जबाबदार कोण?" उत्तर देण्याची मागणीचकाँग्रेस आमदार गायकवाड शिंदे फडणवीस सरकारकडे केली आहे.