दिल्लीत मुंबई मराठी साहित्य संघाच्या संगीत माऊली नाटकाचे सादरीकरण होणार

Update: 2024-01-18 13:54 GMT

साहित्य संघाने निर्मिती केलेले प्रदिप ओक लिखित आणि प्रमोद पवार दिग्दर्शित संगीत माऊली नाटकाला दिल्लीच्या एन एस डी भारंगम मध्ये विशेष निमंत्रित केले आहे. याचे संगीत- डॉ राम पंडित ,नेपथ्य- सुधीर ठाकूर,प्रकाश - श्याम चव्हाण यांची असून शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतलेल्या साहिल विशे,तन्वी गोरे, श्रेयस व्यास ,डॉ गौरी पंडित अशी नव्या दमाची मंडळी काम करीत आहेत. नुकताच डॉ.गौरी पंडित यांना दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राचा उदयोन्मुख संगीत नाट्य कलाकार पुरस्कार मिळाला आहे. साहिल इंजिनिअरिंग तर श्रेयस कला शाखेत शिक्षण घेत आहेत. तन्वी शास्त्रीय गायन, कथकमधेही पारंगत आहे. यांच्या जोडीला कविता विभावरी,आनंद पालव,मनोज नटे,सचिन नवरे आहेत.




 


विठ्ठलपंत आणि रुक्मिणीबाई यांच्या जीवन प्रवासावर हे नाटक बेतलेले आहे. सुमधुर संगीत आणि उत्तम अभिनय यामुळे रसिकांच्या मनाचा हे नाटक ठाव घेते. १५ फेब्रुवारी ला, श्रीराम सेंटर,नवी दिल्ली येथे सायं. ६ वाजता याचा प्रयोग सादर होईल. दिल्लीतील मराठी मंडळी, खासदार, सनदी अधिकारी खास निमंत्रित आहेत.

Tags:    

Similar News