महाविकास आघाडी चे आणखी एक मंत्री अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. पूजा राठोड प्रकरणात वनमंत्री संजय राठोड यांना राजीनामा द्यावा लागल्यानंतर 100 कोटीची खंडणी वसूल करण्याच्या कथित प्रकरणात अनिल देशमूख यांना राजीनामा द्यावा लागला होता. त्यातच आता महाविकास आघाडीचे आणखी एक मंत्री अडचणीत येण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रात दुसऱ्या लाटेत चांगल्या उपाययोजना केल्या म्हणून सर्वोच्च न्यायालयासह पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्य सरकारची स्तुती करत आहे. तसंच राज्यात देशात सर्वाधीक लसीकरण करण्यात आलं आहे. मात्र, या लसीकरणामध्ये आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आपलं होम टाऊन असलेल्या जिल्ह्याला सर्वांधिक लसी दिल्याचं वृत्त समोर आलं आहे. त्यामुळं टोपे अडचणीत सापडण्याची चिन्ह आहेत.
टोपे यांनी स्वत:च्या जिल्ह्यासाठी दरियादिली दाखवत दुसऱ्या जिल्ह्यांना वाऱ्यावर सोडलं का? असा सवाल या निमित्ताने उपस्थित होतो.
दरम्यान भारत सरकार च्या स्वास्थ्य आणि परिवार कल्याण मंत्रालयाचे अप्पर सचिव विकास शील यांनी महाराष्ट्र च्या आरोग्य विभागाला पत्र पाठवलं आहे. हे पत्र राज्याचे आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव प्रदीप व्यास यांना पाठवण्यात आलं असून राज्याने जालना जिल्ह्याला देण्यात आलेल्या लसींची माहिती मागण्यात आली आहे.
एका इंग्रजी दैनिकात या संदर्भात वृत्त छापल्यानंतर केंद्राने ही माहिती मागितली आहे.