समीर वानखडेंना अटक करण्याआधी तीन दिवसाची नोटीस द्या : उच्च न्यायालय

Update: 2021-10-28 11:40 GMT

आर्यन क्रुझ पार्टी प्रकरणात रोज नवनवे अपडेट येत असून एका बाजूने अभिनेता शाहरुख खानपुत्र आर्यन खानच्या जामीनावर सुनावणी सुरु असताना मुंबई पोलिसांनी तपासाची घोषणा करताच एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडेंनी अटकेपासून संरक्षण मिळवण्यासाठी हायकोर्टात धाव घेतली. कोर्टाने आदेश देत वानखडेंना अटक करायचे असेल तर तीन दिवस (७२ तास) आधी नोटीस द्यावी असे आदेश दिले आहेत.

क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरण समोर आल्यानंतर रोज आरोप-प्रत्योरापांच्या फैरी सुरु आहे. या प्रकरणात गैरव्यवहाराचे आरोप झाल्यानंत मुंबईतील विविध पोलीस स्टेशनमध्ये तक्रारी आल्या असून याची एकत्रित चौकशी करण्यासाठी मुंबई पोलिसांकडून बुधवारी तपास पथक नेमण्यात आले आहे. त्यानंतर अटकेची शक्यता लक्षात घेत एनसीबीचे मुंबई प्रादेशिक संचालक समीर वानखेडे यांनी आज मुंबई हायकोर्टात याचिक दाखल करत धाव घेतली. त्यांच्या अर्जावर सुनावणी होऊन हायकोर्टाने वानखेडे यांना अटकेपासून संरक्षण दिले आहे. अटक करण्याची गरज भासल्यास ७२ तास आधी नोटीस देण्यात यावी, असे निर्देश कोर्टाने राज्य सरकार आणि पोलिसांना दिले आहेत. त्यामुळे वानखेडे यांना तूर्त दिलासा मिळाला आहे.

मुंबई पोलिसांनी चौकशीसाठी एसआयटी स्थापन केली आहे. त्यामुळे माझ्या अटकेची भीती असल्याने हायकोर्टात आलो असल्याचे समीर वानखेडे यांनी याचिकेत नमूद केले होते. "मी केंद्र सरकारच्या तपास संस्थेचा अधिकारी असून माझे कर्तव्य करत आहे. मात्र, राज्य सरकारकडून मला व्यक्तिशः लक्ष्य केले जात आहे.. त्यामुळे कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते. म्हणून अटकेपासून हंगामी संरक्षण द्यावे", अशी विनंती वानखेडे यांनी याचिकेत केली होती.

मुंबई हायकोर्टारोबरच वानखडेंनी राज्य मागासवर्ग आयोगातही धाव घेतली आहे. `` आपण मागासवर्गीय असल्याने आपल्याला त्रास दिला जात आहे. मागासवर्गीय असल्याने आपल्यावर खोटे आरोप केले जात आहेत. नागरी सेवा उत्तीर्ण होताना समीर वानखेडेंनी दाखवलेले जात प्रमाणपत्र हे खरे असून बदनामी करण्यासाठी कटकारस्थान रचले जात आहे.आपण नागरी सेवेदरम्यान सादर केलेली प्रमाणपत्रे ही योग्य असून त्यामध्ये कोणत्याही प्रकारची छेडछाड करण्यात आलेली नाही. यामुळे जे आरोप केले जात हे त्यामुळे त्रास होत असल्याची तक्रार समीर वानखेडे यांनी मागासवर्गीय आयोगाकडे दिली आहे.

यासंदर्भात समीर वानखेडे यांनी जे खरे आहे ते समोर आणावे आणि योग्य ती कारवाई करावी अशा प्रकारची विनंती केंद्रीय मागासवर्गीय आयोगाकडे केली अ आहे. दुसरीकडे समीर वानखेडे यांची बहीण यास्मिन वानखेडे यांनी नवाब मलिक यांच्या विरोधात तक्रार घेऊन राष्ट्रीय महिला आयोगाकडे धाव घेतली. यास्मिनने सांगितले की, मलिक त्यांना ऑनलाइन धमक्या देत आहे.यास्मिन वानखेडे यांनी राष्ट्रीय महिला आयोगाकडे या प्रकरणी तक्रार नोंदवण्याची विनंती केली. त्यांनी आयोगाला यासंदर्भात एक पत्र लिहिले आहे. "नवाब मलिक यांनी माझ्यावर अनेक खोटे आरोप केले आहेत. माझ्या भावाच्या प्रामाणिक कर्तव्यात अडथळा आणण्यासाठी नवाब मलिक माझ्या कुटुंबावर आणि माझ्यावर खोटे आणि निराधार आरोप करत आहेत. ते पुढे म्हणाले की, नवाब मलिक माझ्या सोशल मीडिया हँडलवरून बेकायदेशीरपणे फोटो काढत आहेत," असे यास्मिन वानखेडे यांनी म्हटले आहे.

Tags:    

Similar News