'मी निर्दोष': आर्यन खानच्या जामिनासाठी मुकुल रोहतगी यांचा हायकोर्टापुढे युक्तीवाद
आर्यन खान करून कोणतेही ड्रग ताब्यात घेतलेले नाही त्याची वैद्यकीय तपासणी झालेली नाही, त्याच्या मित्राकडे( अरबाज मर्चंट) सहा ग्रॅम चरस सापडल्यामुळे मला वीस दिवस अटकेत ठेवत असाल तर अन्याय त्यामुळे तातडीने जामिनावर मुक्तता करावी अशी मागणी आर्यन खानचे वकील मुकुल रोहतगी यांनी आज उच्च न्यायालयाकडे केली.
क्रूझ ड्रग्ज पार्टीप्रकरणी बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्या जामीन अर्जावर मुंबईउच्च न्यायालयात आज सुनावणी झाली. २० ऑक्टोबर रोजी विशेष एनडीपीएस न्यायालयाने जामीन नाकारल्यानंतर आर्यन खानने जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. नंतर या प्रकरणात आर्यनची न्यायालयीन कोठडी ३० ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आली. आर्यन खानच्या जामीन अर्जावरील सुनावणी दरम्यान हायकोर्टात गोंधळ उडाला आहे. कोर्टात वकिलांची गर्दी वाढल्यानं न्यायमूर्ती नितीन सांबरे न्यायासनावरून उठले. कोर्टातील कर्मचा-यांनी सर्वांना बाहेर काढलं असून पंधरा मिनिटांच्या व्यत्ययानंतर मीडिया आणि प्रकरणाशी संबंधित असलेल्यांनाच प्रवेश देण्यात आल्यानंतर कोर्टाचे कामकाज सुरू झाले.
जवळपास १ तास युक्तिवाद करताना मुकुल रोहोतगी म्हणाले, हे प्रकरण 2 ऑक्टोबरपासून सुरू झाले आहे. आर्यन हा ग्राहक नव्हता. आर्यन खानला विशेष अतिथीच्या रुपात क्रुझवर आमंत्रित करण्यात आलं होतं. त्याला प्रतिक गाभा याने आमंत्रित केलं होतं. प्रतिक गाभा हा एक आयोजक आहे. त्याने आर्यन आणि आरोपी अरबाज मर्चंटला आमंत्रित केलं होतं. दोघांना एकाच व्यक्तीने आमंत्रित केलं होतं.
आर्यन खानला चुकीच्या पद्धतीने अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून कुठल्याही प्रकारचं ड्रग्स सापडलेलं नाही. त्यांच्याविरोधात आरोप हा आहे की आरोपी अरबाज मर्चंट सोबत क्रुझवर आला होता आणि त्याच्यावर ड्रग्स ठेवल्याचा आरोप आहे. आर्यन विरोधात कट रचला जातोय. आर्यन अरबाजसोबत आला. आर्यनला अरबाजकडे असलेल्या गोष्टींची माहिती असल्याचा दावा केला जातोय. कुणाच्यातरी बुटामध्ये काय आहे, त्याच्याशी आर्यनचा काही संबंध नाही, असा दावा रोहतगी यांनी केला.
आर्यन खान प्रकरणावरून सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपावर बोलताना ते म्हणाले, आम्हाला कोणताही राजकीय नेता तसेच पंच यांची बाजू घ्यायची नाही. त्यांची बाजू घेऊन हे माझे प्रकरण किचकट करायचं नाही. राजकीय व्यक्ती तसेच पंचांशी आर्यन खानचा कोणताही संबंध नाही, असंही रोहतगी यांनी यावेळी स्पष्ट केलं.
आर्यन खानचा मोबाईल एनसीबीकडून जप्त करण्यात आला आहे. त्यानंतर ड्रग्ज पार्टीचा पंचनामा करण्यात आला. मात्र, या पंचनाम्यात आर्यन खानचा मोबाईल जप्त केल्याचा उल्लेख का नाही, असा सवाल रोहतगी यांनी सुनावणी दरम्यान उपस्थित केला. त्याचबरोबर रोहतगी यांनी कोर्टात पंचनामा वाचून दाखवला. आर्यन खानवर NDPS च्या 8(c), 20b, 27 आणि कलम 35 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. या कलामंर्गत गुन्हा सिद्ध झाला तर कमाल 1 वर्षाची शिक्षा दिली जाते असं सांगितलं.
आर्यन खानचा संबंध अरबाज मर्चंट तसेच अचित कुमार यांच्याशी जोडला जाऊ शकतो. पण यातील अचित कुमार हा क्रूझ पार्टीत नव्हता. त्याला घरुन अटक करण्यात आलं. आर्यन तसेच अचित यांच्यात ऑनलाईन गेमिंगसंदर्भात चर्चा झाली. विशेष म्हणजे हे चॅटिंग 12 ते 14 महिन्यांपूर्वी झालेलं आहे, असा दावा रोहतगी आणि अमित देसाई यांनी केला. आर्यन खान आणि अचित यांच्यात फक्त पोकर गेमबद्दल चर्चा झाल्याचं सांगत ते चॅटिंग न्यायालयासमोर सादर करण्यात आलं.
मुकुल रोहतगींनी आर्यनच्या जामिनासाठी जवळपास एक तास युक्तिवाद केला. त्यानंतर मुकुल रोहतगी यांनी केसशी संबंधित हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाच्या काही महत्त्वपूर्ण संदर्भ देणाऱ्या निकालांचं वाचन केले. आर्यनला गोवण्यासाठी एनसीबीनं साल 2018 पासूनच्या व्हॉट्सऍपचा संदर्भ जोडला आहे. या चॅटमधून काहीही सिद्ध होत नाही एनसीबीसाठी तो महत्त्वाचा पुरावा असेल मात्र त्याचा या घटनेशी कुठेही संबंध लागत नाही. आपण तिथं जाऊ, हे खाऊ, ते पिऊ या गोष्टी पुरावा कसा मानता येतील? असं रोहतगी यांनी युक्तीवादात म्हटलं आहे.
आर्यनला गोवण्यासाठी एनसीबीनं साल 2018 पासूनच्या व्हॉट्सऍपचा संदर्भ जोडला आहे. या चॅटमधून काहीही सिद्ध होत नाही एनसीबीसाठी तो महत्त्वाचा पुरावा असेल मात्र त्याचा या घटनेशी कुठेही संबंध लागत नाही. आपण तिथं जाऊ, हे खाऊ, ते पिऊ या गोष्टी पुरावा कसा मानता येतील? असं रोहतगी यांनी युक्तीवादात म्हटलं आहे. आर्यन खान जामीन अर्जावरील सुनावणी उद्यापर्यंत पुढे ढकलण्यात आली असून उद्या दुपारी अडीच वाजता पुन्हा या प्रकरणावर सुनावणी सुरू होईल असे न्यायमूर्तींनी स्पष्ट केले.
क्रूज पार्टी प्रकरणी अटकेत असलेल्या मनीष गरहीया आणि अवीन साहू यांना जामीन मंजूर करण्यात आला असून त्यांच्याकडून प्रत्येकी 50 हजार रुपयांचा बॉंड घेण्यात येणार आहे. NDPS स्पेशल कोर्टाचे जज VV पाटील यांनी जामीन मंजूर केला आहे.