मुकेश अंबानींच्या 15 फुटी पुतळ्याची नागोठणे प्रकल्पग्रस्त का काढणार रथयात्रा ?

पोलिसांची लाठी खाऊ , छातीवर बंदुकीची गोळी झेलू , जोपर्यंत मागण्या मंजूर होत नाही , तोपर्यंत मागे हटणार नाही , लढाई लढतच राहणार . रिलायन्स नागोठणे प्रकल्पग्रस्तांचा एकमुखी निर्धार केला आहे.

Update: 2020-11-22 09:11 GMT

पूर्वीची आयपीसीएल व आत्ताची रिलायन्स यांनी स्थानिक भूमिपुत्र व प्रकल्पग्रस्तांना 1287 प्रमाणपत्र दिले होते. यापैकी 601 प्राधान्य प्रमाणपत्र धारक ,110 नलीकाग्रत व ज्या शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावर एमआयडीसीचां शिक्का आहे अशा सर्व शेतकरी यांना कायमस्वरूपी नोकरीत समाविष्ट करून  त्यांना  आजवरचा  संपूर्ण पगार, तसेच  वार्षिक बोनस देण्यात यावा या प्रमुख मागणीसाठी शिहू नागोठणे विभागातील स्थानिक भूमिपुत्र, प्रकल्पग्रस्त, नलिकाग्रस्त यांनी एकजुटीने हा लढा उभारला आहे. 

भारत सरकार , दिल्ली सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती मा.पी. बी . सावंत साहेब संस्थापक लोकशासन आदोलन यांच्या मार्गदर्शनात व मुंबई उच्च न्यायालायचे माजी न्यायमूर्ती मा . बी . जी . कोळसे पाटील राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या नेतृत्वात ३६ वर्षानंतर प्रथमच पचक्रोशी मौजे नागोठणे ते | मौजे चोळे ३६ वर्षापासून प्रकल्पग्रस्त , नलिकाग्रस्त याच्यावर आजपर्यंत होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात मा मुकेश अंबानी यांच्या १५ फुट उंचीच्या प्रतिकात्मक पुतळ्याची रथयात्रा शुक्रवार दिनांक २७ नोव्हेंबर २०२० रोजी , काढण्यात येणार आहे.जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत मागे हटणार नाही . वेळ प्रसगी लाठी खाऊ , छातीवर बंदुकीच्या गोळ्या झेलू असा इशारा देत मे रिलायन्स इंडस्ट्रीज लि.नागोठणे कारखान्यात कायम स्वरूपी कामावर रुजू करून घेतलेच पाहिजे . दोन वेळा जेल मध्ये जाऊन ३ महिने तुरुंगवास पत्करलेला आहे . आता करोना काळात जीव धोक्यात घालून जीवाची , जगण्याची परवा न करता अन्यायाच्या विरोधात न्याय हक्काची लढाई लढत असताना आमच्या आंदोलनकर्त्यांवर नागोठणे पोलिस ठाण्यात खोटे २ गुन्हे नोंदविण्यात आलेले आहेत.असे अनेक अन्याय अत्याचर सहन करून देखील आम्ही मागे हटलो नाही . मागण्या जोपर्यंत मजूर होत नाही , तोपर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहणार .

पंचक्रोशीतील सर्व प्राधान्य प्रमाणपत्र धारक नलिकाग्रस्त प्रमाणपत्र धारक , ज्याच्या ७/१२ उताऱ्यावर MIDC चा शिक्का आहे परंतु प्रमाणपत्र नाही कंत्राटी कामगार , सेवा निवृत्त कामगार , सुशिक्षित बेरोजगार कायम स्वरूपी कामगार यांना कळविण्यात येते कि , ३६ वर्षे प्रलंबित असलेल्या मागण्या बाबत शुक्रवार दिनाक २७/११/२०२० रोजी खालील मागण्यावर रिलायस इंडस्ट्रीज लिमिटेड नागोठणे व्यवस्थापन व लोकशासन आदोलन संघर्ष समिती बरोबर खालील मागण्यावर निर्णायक चर्चा होणार आहे . या सर्व मागण्या मंजूर करून घेण्यासाठी पंचक्रोशीतील समस्त ग्रामस्तानी आबेघर - वेलशेत चौकात एकत्र जमावे असे आवाहन लोकशासन संघर्ष समितीचे मुख्य संघटक राजेंद्र गायकवाड यांनी रविवारी केले आहे. दरम्यान मुकेश अबानी यांच्या १५ फुट उंचीच्या पुतळ्याची रथयात्रेस सुरुवात होऊन कडसुरे मटेरियल गेट येथे रथ यात्रा मागण्या मजूर करून घेण्यासाठी थांबणार आहे, तरी रथ यात्रेसाठी येताना सर्वांनी मास्क , सेनीटायझर शाल.मफलर कानटोपी , स्वेटर उबदार कपडे व एक वेळचे जेवून घेवून सर्वांनी प्रत्येक व्यक्तीत दोन हाताचे सुरक्षित अंतर ठेवून आपल्या कुटुंब परिवारासह उपस्थित राहावे असे आवाहन देखील करण्यात आले आहे.

रिलायन्स नागोठणे प्रकल्पग्रस्त , नलिकाग्रस्त आता करो या मरोच्या भूमिकेत आहेत. प्रमुख मागण्यामध्ये

1) कामावर घेण्यासाठी अंतिम तारीख निश्चित करून त्वरित देण्यात यावी : विशेष भूसंपादन अधिकारी क्रमाक - परायगड अलिबाग यांनी उर्वरित ६०१ प्राधान्य प्रमाणपत्र धारक ११० नलिकाग्रस्त प्रमाणपत्र धारक व नव्याने समाविष्ट झालेले , ज्याच्या ७ / १२ उताऱ्यावर MIDC चा शिक्का आहे परंतु त्यांना प्रमाणपत्र मा . विशेष भूसंपादन अधिकारी क्रमांक -१ रायगड अलिबाग यांनी दिलेले नाही . अशा सर्व प्रकल्पग्रस्त व्यक्तींना मे रिलायन्स इंडस्ट्रीज लि , व्यवस्थापन नागोठणे येथिल कंपनीत कायमस्वरूपी कामावर रुजू करून घेण्यासाठी अंतिम निश्चित तारीख त्वरित देण्यात यावी .

2 ) दर महिन्याचा पगार व वार्षिक बोनस व्याजासह दिलाच पाहिजे . :

६०१ प्राधान्य प्रमाणपत्र धारक ११० नलिकाग्रस्त व ज्यांच्या ७/१२ उताऱ्यावर MIDC चा शिक्का आहे परंतुमा विशेष भूसपादन अधिकारी क्र .१ रायगड अलिबाग यांनी प्रमाणपत्र दिलेले नाही असे प्रमाणपत्र दिलेल्या तारखे पासून ते आजपर्यंतचा दर महिन्याचा पगार व वार्षिक बोनस व्याजासह दिलाच पाहिजे .

3 ) आमच्या शेतजमिनी आम्हाला परत द्या :

६०१ प्राधान्य प्रमाणपत्र धारक , ११० नलिकाग्रस्त व ज्यांच्या ७/१२ उताऱ्यावर MIDC चा शिक्का आहे . परंतु मा.विशेष भूसंपादन अधिकारी क्रपरायगड अलिबाग यानी प्रमाणपत्र दिलेले नाही असे में रिलायन्स इंडस्ट्रीज लि.नागोठणे येथील कपनीमध्ये कायमस्वरूपी कामावर घेता येत नसेल आणि प्रमाणपत्र दिलेल्या तारखेपासून ते आजपर्यंत दरमहाचा पगार व वार्षिक बोनस व्याजासह देता येत नसेल तर आमच्या शेतजमिनी आम्हाला परत द्या .

4 ) निवृत्तीचे वय मर्यादा ही वय वर्षे ५८ ऐवजी वय वर्षे ६० झालीच पाहिजे :

सर्व प्रकल्पबाधित निवृत्त कामगाराच्या वारसांना में रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड नागोठणे येथील कंपनीत कायम स्वरूपी कामावर घेतलेच पाहिजे आणि कामगाराचे निवृत्तीचे वय मर्यादा ही वय वर्षे ५८ ऐवजी वय वर्षे ६० झालीच पाहिजे .

5 ) कंत्राटी कामगारांना समान काम समान वेतन कायदा लाग झालाच पाहिजे :

कंत्राटी कामगारांना कामगार कायद्याप्रमाणे समान काम समान वेतन अंतर्गत कायम कामगार इतके वेतन दिलेच पाहिजे.कवाटी कामगारांचे बंद केलेले पास त्वरित चालू करा कंत्राटी कामगारांच्या कामाची अल्टरनेट पद्धत बंद कराआणि सलग ३० दिवस कत्राटी कामगारांना काम दिलेच पाहिजे अन्यथा ३० दिवसाचा पगार दिलाच पाहिजे आणि कत्राटी कामगाराला या वर्षीचा दिवाळी बोनस त्याच्या पगाराच्या तीनपट दिलाच पाहिजे.सपूर्ण लॉकडाऊन काळातील पगार , व करोना बाधित असलेल्या कंत्राटी कामगाराचा विलगीकरण काळातील पगार व १ महिन्याचे रेशन दिलेच पाहिजे .

6 ) किमान ८० % स्थानिक उमेदवारांना नोकऱ्या मध्ये प्राधान्याने घेतलेच पाहिजे :

स्थानिक सुशिक्षित तरुण बेरोजगार सर्व घटकांमध्ये पर्यवेक्षकीय श्रेणीत किमान ५० % व पर्यवेक्षकीयसहित इतर श्रेणीत किमान ८० % स्थानिक उमेदवारांना नोकऱ्यांमध्ये प्राधान्याने घेतलेच पाहिजे .

7 ) निलंबित केलेल्या कामगारांना त्वरित कामावर रुजू करून घेतलेच पाहिजे :

आदी मागण्यांचा समावेश असून आमच्या मागण्या मान्य करा नाहीतर जमिनी परत करा अशी मागणी प्रकल्पग्रस्तांनी लावून धरली आहे. त्यामुळे हे आंदोलन अधिक उग्र स्वरूप धारण करीत असल्याचे दिसून येत आहे.

Tags:    

Similar News