मराठवाड्यातील 31 हजार थकबाकीदारांचे मीटर जप्त होणार

वारंवार नोटीसा बजावल्यानंतरही वीजबिल थकबाकी भरणा न केल्याने महावितरण आता अशा ग्राहकांवर धडक कारवाई करण्याच्या पवित्र्यात आहे. मराठवाड्यातील 31 हजार 857 औद्योगिक व वाणिज्यिक ग्राहकांना महावितरणे याबाबतच्या नोटीसा बजावल्यात

Update: 2021-12-29 02:01 GMT

औरंगाबाद // वारंवार नोटीसा बजावल्यानंतरही वीजबिल थकबाकी भरणा न केल्याने महावितरण आता अशा ग्राहकांवर धडक कारवाई करण्याच्या पवित्र्यात आहे. मराठवाड्यातील 31 हजार 857 औद्योगिक व वाणिज्यिक ग्राहकांना महावितरणे याबाबतच्या नोटीसा बजावल्यात. मात्र, त्यांनी वीजबिल न भरल्याने अशा ग्राहकांचे थेट वीजमीटर जप्त करण्याची कारवाई करण्यात येणार आहे. यासाठी लवकरच मोहीम हाती घेण्यात येईल.

मराठवाड्यातील सर्व वर्गवारीतील ग्राहकांकडे कोट्यवधी रुपयांची वीजबिल थकबाकी आहे. यातील अनेक ग्राहक दरमहा येणारे चालू महिन्यातील वीजबिल भरणा करीत नाहीत. त्यामुळे महावितरणनने कालपासून हर घर दस्तक मोहीम हाती घेतली आहे.

मराठवाड्यातील 31 हजार 857 ग्राहकांकडे तब्बल 43.80 कोटी रुपयांची थकबाकी आहे. अशा ग्राहकांचे वीजमीटर जप्त केले जाणार आहे. ही कारवाई टाळायची असेल तर औद्योगिक, वाणिज्यिक थकबाकीदार ग्राहकांनी वीजबिले भरून सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणच्या अधिकाऱ्यांनी केले आहे.

Tags:    

Similar News