MPSC Hall Ticket Leak : बापरे ! MPSC च्या विद्यार्थ्यांची माहिती हॅकरच्या हाती

MPSC ची परीक्षा तोंडावर आली असतानाच विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट टेलिग्राम गृपवर लिक झाले आहेत. त्यामुळे डेटा सुरक्षेच्या मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.;

Update: 2023-04-23 10:37 GMT

MPSC ची गट ब आणि गट क ची परीक्षा 30 एप्रिल रोजी होणार आहे. त्यापुर्वी MPSC ने विद्यार्थ्यांचे Hall Ticket जारी केले होते. दोन दिवसांपुर्वी हे हॉल तिकीट जारी केले असतानाच या हॉल तिकीटची लिंक सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. यामध्ये जवळपास 95 हजार हॉल तिकीट असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे परीक्षेपुर्वीच विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट लिक झाल्याने विद्यार्थ्यांचे टेन्शन वाढले आहे.

टेलिग्राम वापरकर्ते बळीराम डोळे यांनी हा काय प्रकार आहे. 90 हजार पेक्षा जास्त संयुक्त पूर्व परीक्षेचे हॉल तिकीट अपलोड होत आहेत. इतका डेटा कुठून लिक झाला. का झाला? तुम्हाला ऑनलाईन मेन्स घायच्या आहेत का? असा सवा यावेळी विद्यार्थ्यांनी विचारला आहे.

MPSC 2023 A नावाने असलेल्या टेलिग्राम चॅनलवर 95 हजार हॉल तिकीट टाकले आहेत, असंही म्हटलं आहे.

MPSC च्या वेबसाईटला भेट दिली तर त्याठिकाणी असलेला हॉल तिकीटचा पर्याय हटवण्यात आला आहे. त्यामुळे आयोगाने स्पष्टीकरण देण्याची मागणी केली आहे.

MPSC 2023 A या गृपने आणखी एक मेसेज केला आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, हा फक्त नमुना डेटा आहे. आमच्याकडे MPSC च्या विद्यार्थ्यांची ऑनाईन पोर्टल लॉग इन, फी पावती, अपलोड केलेले कागदपत्र, आधार कार्ड क्रमांक, दुरध्वनी क्रमांक, ई मेल आयडी आणि बरेच काही. त्यामध्ये पूर्व परीक्षेची प्रश्नपत्रिका 2023 देखील उपलब्ध असल्याचा दावा या टेलिग्राम गृपवर करण्यात आला.

यावरून विद्यार्थ्यांनी लोकसेवा आयोगाला प्रश्न विचारण्यास सुरूवात केल्यानतंर आयोगाने पुन्हा नोटीफिकेशन जारी केले आहे. यामध्ये MPSC ने म्हटले आहे की, 30 एप्रिल रोजी विषयांकित परीक्षेचे प्रवेशपत्र 21 एप्रिल रोजी वेबसाईटवर बाह्यलिंकद्वारे अपलोड केले होते. ही लिंक टेलिग्राम चॅनलवर व्हायरल होत असल्याची बाब समोर आली. त्यानंतर या बाह्यलिंकद्वारे उपलब्ध करून देण्यात आलेली लिंक बंद करण्यात आली. या गृपवर व्हायरल झालेली प्रवेशपत्रं वगळता इतर कुठलाही डेटा लिक झालेला नाही. याची तज्ज्ञांकडून खात्री करण्यात आली आहे. तसेच प्रश्नपत्रिका आणि इतर डेटा उपलब्ध असल्याचा करण्यात आलेला दावा खोटा आहे. ज्या गृपवर ही प्रवेशपत्र लिक झाली होती. त्या गृपच्या Admin विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्याबरोबरच परीक्षा वेळेवरच होणार असल्याचे स्पष्टीकरण MPSC ने दिले आहे.

मात्र एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचा डेटा लिक झाल्याने एमपीएससीचा भोंगळ कारभार समोर आला आहे.

Tags:    

Similar News