महाराष्ट्रानंतर गोव्यातही महाविकास आघाडीचा प्रयोग? संजय राऊतांनी घेतली काँग्रेस नेत्यांची भेट

गोव्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी तयारी सुरु केली आहे. दरम्यान महाराष्ट्राप्रमाणे गोव्यातही महाविकास आघाडीचं सरकार स्थापन करण्यासाठी प्रयत्न सुरु केलेत. या निवडणुकीत शिवसेना आणि काँग्रेस एकत्र येऊन निवडणूक लढण्याची शक्यता आहे.

Update: 2022-01-04 05:01 GMT

मुंबई // गोव्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी तयारी सुरु केली आहे. दरम्यान महाराष्ट्राप्रमाणे गोव्यातही महाविकास आघाडीचं सरकार स्थापन करण्यासाठी प्रयत्न सुरु केलेत. या निवडणुकीत शिवसेना आणि काँग्रेस एकत्र येऊन निवडणूक लढण्याची शक्यता आहे.

शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत सध्या गोव्यात असून यावेळी त्यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिनेश गुंडू राव आणि गिरीश चोडणकर यांची भेट घेतली.

संजय राऊत यांनी याबाबत एक ट्वीट केले आहे.ज्यात त्यांनी गोव्यात काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांबरोबर आगामी विधानसभा निवडणुकीबाबत चर्चा केली असल्याचं सांगितलं आहे.

यावेळी काँग्रेसचे वरिष्ठ नेते दिनेश गुंडू राव, दिगंबर कामत आणि गिरीश चोडणकर तसंच माझे सहकारी जीवन कामत जितेश कामत उपस्थित होते. महाराष्ट्राप्रमाणे गोव्यात महविकास आघाडीचा प्रयोग करता येईल का? यावर चर्चा झाली असल्याचं संजय राऊत यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, संजय राऊत यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्यांच्या भेटीगाठी घेणार आहेत. गोव्यात भाजपाचे माजी सहकारी महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टीने (MGP) गोव्यात तृणमूल काँग्रेससोबत (TMC) हात मिळवला आहे. तर दुसरीकडे गोवा फॉरवर्डच्या विजय सरदेसाईंनी संभाव्य आघाडीसाठी दिल्लीमध्ये राहुल गांधींची भेट घेतली.

Tags:    

Similar News