'तुमच्या सल्ल्याची आम्हाला गरज नाही' , खासदार संजय राऊत यांचा चंद्रकांत पाटलांना टोला

मुख्यमंत्र्यांशिवाय राज्य चालत नाही या चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावर संजय राऊत म्हणाले की, तुमच्या सल्ल्याची गरज नाही, तुमच्या सल्ल्यावर राज्य चालत नाही. मुख्यमंत्री सक्षम आहेत;

Update: 2021-12-22 04:57 GMT

नवी दिल्ली // शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नवी दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधताना भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. यावेळी त्यांनी लखीमपूर खेरी, उत्तर प्रदेश निवडणूक, विधिमंडळाचं अधिवेशन, महाराष्ट्र सरकार, ओमिक्रॉन अशा विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. लखीमपूर खेरी प्रकरणी आम्ही मार्च काढला होता. राहुल गांधी यांनी त्यावेळी सांगितलं की, काही झालं तरी आम्ही तुरुंगात पाठवल्याशिवाय राहणार नाही. शेतकरी आंदोलनाचा इतिहास पाहता हे अशक्य नाही.सोबतच उत्तर प्रदेशात सत्ताबदल होतोय, त्यापाठोपाठ केंद्रातही सत्ता बदल होणार आहे, असं राऊत यांनी म्हटले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, देशाचे गृहमंत्री उत्तर प्रदेशात आठ आठ दिवस मुक्काम टाकून का बसलेले आहेत,असा सवाल राऊत यांनी केला. पश्चिम बंगालमध्येही त्यांनी असाच मुक्काम ठोकला होता. मात्र, त्यांचा पराभव झाला होता, असं राऊत म्हणालेत.

तर, पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रातून एक नवी सुरुवात झाली. देशातील पाच राज्यातील परिवर्तनाची दिशा काय आहे हे तुम्हाला दिसून येईल, असं राऊत म्हणाले.

दरम्यान मुख्यमंत्र्यांशिवाय राज्य चालत नाही या चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावर संजय राऊत म्हणाले की, तुमच्या सल्ल्याची गरज नाही, तुमच्या सल्ल्यावर राज्य चालत नाही. मुख्यमंत्री सक्षम आहेत, उपमुख्यमंत्री सक्षम आहेत.

तर, विधानसभा अध्यक्ष निवडणुकीचा नियम बदलल्यावरुन टीका होत असल्यावर 'आम्ही तो धडा केंद्र सरकारकडून घेतला आहे' , मोदी सरकारच्या पावलावर आम्ही काही गोष्टींसाठी पाऊल टाकत आहोत असं राऊत म्हणाले.

Tags:    

Similar News