केळी पीक विम्याचा विषय हा केंद्राचा असला तरी याचे कार्यान्वयन हे राज्य सरकारच्या माध्यमातून होत असते. राज्याने या निकषात बदल न केल्यामुळे केळी उत्पादकांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे या प्रकरणी आमच्यावर होत असलेले आरोप हे निराधार असून आधी आपण याचा पूर्ण अभ्यास करून मगच आमच्यावर आरोप करावेत अस खासदार रक्षा खडसे यांनी म्हटलं आहे.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल जळगाव जिल्ह्याचा दौरा केला होता. यावेळी त्यांनी केळी पिकाच्या नुकसानीची पाहणी केली होती. त्यानंतर खासदार रक्षा खडसे यांनी माध्यमांशी संवाद साधला.