जेवायची सोय काय ?? दोन वेळेचं पॅकेट सरकार घरी पाठवणार आहे का ?? नारायण राणे यांचा सरकारला सवाल

Update: 2021-04-02 12:29 GMT

ज्यांना स्वतःचे कुटुंब सांभाळता येत नाही ते राज्य काय सांभाळणार असं सांगत मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंनी ताबडतोब सत्तेतून पायऊतार व्हावे असे सांगत लॉकडाऊन केलं तर जेवायची सोय काय ?? दोन वेळेचं पॅकेट सरकार घरी पाठवणार आहे का ?? असा सवाल खा. नारायण राणे यांनी उपस्थित केला आहे.

कोरोनाचा उद्रेक आणि लॉकडाऊनवरुन भाजपचे खासदार नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टिका केली आहे. ते म्हणाले, राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असून परीस्थिती बिकट झाली आहे. सरकारमधील इतर दोन पक्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादी उतावळे नाही आहेत. परंतु मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उतावळे आहेत. मुख्यमंत्री माझं कुटुंब माझी जबाबदारी बोलायचं सोडून देतील. कारण त्यांच्या कुटुंबातील सर्वच कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यांना कुटुंबाची जबाबदारी पार पाडता आली नाही. त्यांचं धोरण चुकीचं आहे, म्हणून कोरोनाचे रुग्ण पुन्हा एकदा वाढत आहेत, अशी टीका नारायण राणे यांनी केली.


Full View
Tags:    

Similar News