ज्योतिरादित्य सिंधिया यांनी ट्विटरुन ‘भाजपा’ हटवले? काय आहे सत्य?

Update: 2020-06-06 09:34 GMT

ज्योतिरादित्य सिंधिया यांनी गेल्या महिन्याभरापुर्वी कॉंग्रेसला राम राम ठोकत भाजप मध्ये प्रवेश केला होता. या प्रवेशानं मध्यप्रदेश च्या राजकारणात भूकंप आला होता. मात्र, ज्योतिरादित्य यांनी त्यांच्या ट्विटर अकांउंट वरुन ‘भाजपा’ हा शब्द हटवला असल्याच्या बातम्या अनेक वृत्तपत्रांनी दिल्या आहेत.

मात्र, हे वृत्त निराधार असल्याचं राठोड यांनी ट्विट केलं आहे. या ट्विट मध्ये ज्योतिरादित्य यांनी आपल्या बायोमध्ये कोणताही बदल केला नव्हता. या अगोदरच त्यांच्या बायो मध्ये क्रिकेट प्रेमी आणि जनसेवक असंच लिहिलेलं आहे.

थोडक्यात भाजप मध्ये प्रवेश करताना ज्योतिरादित्य यांनी त्यांच्या ट्विटर मध्ये भाजपचं नाव समाविष्ट केलं नसल्याचं राठोड यांचं म्हणणं आहे. विशेष म्हणजे हे ट्विट ज्योतिरादित्य यांनी रिट्विट मारलं आहे.

तसंच या खोट्या बातम्या आहेत. असं ट्विट ही ज्योतिरादित्य यांनी केलं आहे.

त्यामुळं ज्योतिरादित्य यांनी त्याच्या प्रोफाईल मध्ये भाजपचा कधीच समावेश केला नसल्याचं स्पष्ट होतं. मात्र, त्यांच्यासह ज्या 24 आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांना पोटनिवडणूकीत भाजप कडून तिकिट मिळेल का? हा प्रश्न आहे. तसंच ज्योतिरादित्य यांना केंद्रात मंत्रीपद दिलं जाण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, अद्यापपर्यंत हा निर्णय न झाल्यानं ते नाराज असल्याचं बोललं जात आहे.

Similar News