Fact Check : मुख्यमंत्र्यांनी घेतलं लेकाचं नाव, ANI ने छापल बापाचं नाव, पाहा फेक न्यूजचा पर्दाफाश

Update: 2023-09-05 15:58 GMT

गेल्या काही दिवसांपासून फेक न्यूजचं प्रमाण वाढलं आहे. त्यातच ANI या वृत्तसंस्थेने आसामच्या मुख्यमंत्र्यांचं कोट वापरलं आहे. त्यामध्ये आसामच्या मुख्यमंत्र्याने लेकाचं नाव घेतलं असतानाही एएनआयने मात्र बापाचं नाव लिहून फेक बातमी दिल्याचं पहायला मिळालं.




 


केंद्र सरकार फेक न्यूजवर नियंत्रण आणण्यासाठी डेटा प्रायव्हसी प्रोटेक्शन बिल घेऊन आले. त्यामध्ये फेक न्यूज देणाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचं म्हटलं आहे. मात्र आता लेकाने केलेलं वक्तव्य बापाच्या तोंडी घातल्याचा प्रकार एएनआय या वृत्तसंस्थेने केला आहे.

आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांनी माध्यमांशी बोलताना म्हणाले की, माझ्याकडे एक राजकीय व्यक्तीचं वक्तव्य आहे. जे वक्तव्य पी चिदंबरम यांनी केलं आहे. मी अशाच प्रकारचं वक्तव्य काँग्रेस अध्यक्ष खर्गे यांनी दिल्याचं पाहिलं. मी तामिळनाडूच्या मंत्र्यांच्या वक्तव्याचा निषेध करणार नाही. कारण त्यांना आधीच उघडं पाडलं आहे. परंतू हा प्रश्न काँग्रेसला आहे कारण काँग्रेस अजूनही डीएमके सोबत आघाडीत आहे. त्यामुळे ही राहूल गांधी यांची टेस्ट आहे. त्यामुळे राहुल गांधी यांना निर्णय घ्यायचा आहे की, ते सनातन धर्मासोबत आहेत की नाही? त्यांनी डीएमके सोबतचे संबंध तोडले नाहीत तर ते हिंदूविरोधी असल्याचे स्पष्ट होईल, अशी बातमी एएनआय या वृत्तसंस्थेने दिली आहे.

यानंतर मॅक्स महाराष्ट्रने आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्व सरमा यांचा व्हिडीओ पाहिला. त्या व्हिडीओमध्ये आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा बोलताना म्हणतात की, माझ्याकडे एक राजकीय व्यक्तीचं वक्तव्य आहे. जे वक्तव्य कार्ती चिदंबरम यांनी केलं आहे. मी अशाच प्रकारचं वक्तव्य काँग्रेस अध्यक्ष खर्गे यांनी दिल्याचं पाहिलं. मी तामिळनाडूच्या मंत्र्यांच्या वक्तव्याचा निषेध करणार नाही. कारण त्यांना आधीच उघडं पाडलं आहे. परंतू हा प्रश्न काँग्रेसला आहे कारण काँग्रेस अजूनही डीएमके सोबत आघाडीत आहे. त्यामुळे ही राहूल गांधी यांची टेस्ट आहे. त्यामुळे राहुल गांधी यांना निर्णय घ्यायचा आहे की, ते सनातन धर्मासोबत आहेत की नाही? त्यांनी डीएमके सोबतचे संबंध तोडले नाहीत तर ते हिंदूविरोधी असल्याचे स्पष्ट होईल, असं स्पष्टपणे हिमंता बिस्वा सरमा बोलताना दिसत आहेत.

या व्हिडीओसोबत हिमंता बिस्वा सरमा यांनी ट्वीट करून म्हटलं आहे की, त्यामध्ये धर्म एव हतो हन्ति धर्मो रक्षति रक्षितः तस्माद्धर्मो न हन्तव्यो मा नो धर्मो हतोऽवधीत्॥

मात्र एएनआयचं ट्वीट पाहिलं तर त्या व्हिडीओमध्ये आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा हे कार्ती चिदंबरम अशा उल्लेख करतात. पण एएनआयने आपल्या ट्वीटवर लिहीताना माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचं नाव वापरलं आहे. हे एएनआयने जाणून बुजून केलं आहे का? हा काँग्रेस पक्षावर चिखलफेक करण्याचा प्रयत्न आहे का? असे अनेक प्रश्न आता निर्माण होत आहेत.

एवढंच नाही तर हिमंत बिस्वा सरमा यांनी पी. चिदंबरम यांचे नाव घेतल्याचा दावा केल्याने लोकांमध्ये त्यांच्याविषयीही संभ्रम निर्माण होऊ शकतो. दुसरीकडे पी. चिदंबरम यांचं नाव वापरल्याने काँग्रेस पक्षाची आणि त्यांची स्वतःची प्रतिमाही डागाळू शकते.

आसामच्या मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी घेतलं पी. चिदंबरम यांच्या मुलाचं नाव. पण एएनआयने पी. चिदंबरम यांचेच नाव लिहून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे.

यावरून ही बातमी खोटी असल्याचं स्पष्ट होत आहे.

Similar News