आगामी काही दिवसातच राज्यामध्ये लोकसभा निवडणुका येऊ घातल्या आहेत त्यामुळे प्रत्येक पक्ष आपला खंबीर उमेदवार असावा अशी प्रत्येक पक्षाची अपेक्षा असती त्याच पद्धतीने प्रत्येक मतदारसंघात एक मतबर हुशार लोकाभिमुख चर्चेत असलेला एक नेता लोकसभेच्या रिंगणात असायला हवा असं पक्षाला वाटत असतं मात्र एकीकडे राज्यामध्ये मराठा आरक्षण हा विषय एवढा मोठा होत गेला आहे की या आरक्षणाच्या पायी गावामध्ये नेत्यांना येण्यास गाव बंदी देखील घातली आहे त्यामुळे या निवडणुका कशा पार पडतील हे सुद्धा पाहणं औचित त्याचं ठरणार आहे.
गेली अनेक वर्ष मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी राजकीय नेत्यांनी प्रयत्न केले मात्र या प्रयत्नाला यश मिळालं नाही अनेकांचे बलिदान गेले तरीही सरकारला जाग आली नाही मात्र गेली सहा महिन्यापासून जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी या गावातील मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे यासाठी अत्यंत छोट्या कुटुंबातून उभा राहिलेला हे नेतृत्व संपूर्ण महाराष्ट्राला मान्य केलं आणि लाखोच्या संख्येने मराठा समाज मनोज जरांगे यांच्या पाठीशी उभा राहिला, मात्र त्यामध्ये अनेक आंदोलन झाली मोर्चे झाले या मराठा आंदोलनाला हिंसक वळण देखील लागलं मात्र तरीही सरकार याची कसलीही दखल घेत नसल्याचे आपण अनेक दिवस पाहिलं अखेर मराठा समाजाला आरक्षण मिळावे याच्यासाठी अंतरवलीसराटी ते थेट मुंबई हा कडे हा मोर्चा पळवला आणि लाखोंचा समुदाय मुंबईकडे आरक्षणाच्या मागणीसाठी गेला वाशीमध्ये मोठी सभा झाली आणि या सभेच्या दरम्यान 26 जानेवारी 2024 रोजी रात्री दोन वाजता एक आद्य आदेश काढण्यात आला आणि यातूनच मराठा समाजाला आरक्षण मिळालं म्हणून 27 जानेवारी 2024 रोजी संपूर्ण महाराष्ट्रभर आरक्षणाचा गुलाल उधळला मात्र पुन्हा मनोज जरांगे पाटील व मराठा समन्वयक समितीच्या लक्षात आलं की हा आरक्षणाचा जीआर नसून हा आद्य आदेश काढण्यात आलेला आहे त्यामुळे मनोज रंगे पाटील यांनी पुन्हा अंतर्वली सराटी येते अमर उपोषणाची घोषणा केली आणि तब्बल 15 ते 16 दिवस त्यांनी अमरण उपोषण केलं, दरम्यान शिंदे सरकारने विशेष अधिवेशन बोलून मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण घोषित केलं मात्र मराठा समाजाचे मागणी आहे की आम्हाला दहा टक्के आरक्षण नको आम्हाला ओबीसी मधूनच आरक्षण द्या आणि कुणबी प्रमाणपत्र सरसकट लागू करा सगळे सोयरे हा अध्यादेश काढून त्याचं कायद्यात रूपांतर करा ही मागणी घेऊन मराठा बांधव आजही सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करताना पाहायला मिळत आहेत, मात्र एकीकडे राज्यांमध्ये लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने महाविकास आघाडीने मनोज जरांगे पाटील यांनी निवडणुकीच्या रिंगणात यावं व जालना मतदार संघातून निवडणूक लढवावी अशी मागणी आता चर्चिली जात आहे.
गरजवंत मराठ्यांच्या लढ्यामध्ये जरांगे पाटील हे नाव मोठ आहे आणि निवडणुकीच्या अनुषंगाने त्यांच्या कडे विविध पक्षांच्या ऑफर देखील आलेल्या आहेत, मात्र या चर्चा या आंदोलनाला फोडण्यासाठी केल्या जात आहेत का...? मराठा समाजाला ओबीसीनेतूनच आरक्षण मिळावं ही त्यांची भूमिका आहे.मनोज जरांगे पाटील निवडणुकीच्या रिंगणात आले तर तशी भूमिका जरी घेतली तरी, तर त्यांनी बीड मतदार संघातून लोकसभेची उमेदवारी घ्यावी अशी आमची मागणी आहे, गरजवंत मराठ्यांसाठी लढणारे जरांगे पाटील जर निवडणुकीच्या रिंगणात आले तर याचा समाज कितपत स्वीकार करणार कारण अनेक मातब्बर नेते देखील आहेत मात्र मराठा समाज हा जरांगे पाटलांना स्वीकारतो का नाही हा देखील प्रश्न आहे म्हणून त्यांनी निवडणुकीच्या रिंगणात येऊ नये,
राजकारण आणि समाजकारण वेगळं आहे आम्ही त्यांना सांगू शकत नाही, जरांगे पाटलांच्या संदर्भामध्ये शासनाने एसआयटी नेमली त्यांच्या आंदोलना विरोधात अनेक जण बोलताना आपण पाहत आहोत त्यामुळे जरांगे पाटलांनी निवडणुकीच्या रिंगणात यावक नाही त्यांचा तो प्रश्न त्यांनी ठरवावा मात्र ही भूमिका घेताना योग्य ती भूमिका घ्यावी मागील सहा महिन्यापूर्वी मनोज जरांगे पाटील यांना कोणीही ओळखत नव्हतं मात्र आंदोलनाच्या माध्यमातून नवीन नेतृत्व निर्माण होत असतं आणि याच्यासाठी मनोज रंगे पाटील यांनी राजकारणात यावं कोणत्याही पक्षाकडून निवडणूक लढवावी जेणेकरून त्यांना राज्याच्या राजकारणात जाता येईल राजकारण्यांना थेट मंत्रालयामध्ये जाऊन प्रश्न विचारता येतील आपण पाहिले की राज्याच्या राजकारणामध्ये आंदोलनाच्या माध्यमातून अनेक नेते तयार झाले यामध्ये रामदास आठवले असतील किंवा अरविंद केजरीवाल असतील हे नेतृत्व आंदोलनाच्या माध्यमातून निर्माण झाले आणि देशाच्या पातळीवर ते आजही राज्याच्या राजकारणात सक्रिय आहेत त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी राजकारणात यावं...
कोणत्याही समाजा मधून एखादा नेतृत्व जर निर्माण होत असेल तर त्या नेतृत्वाने राज्याच्या राजकारणात जाणं गरजेचं आहे कारण आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी आपण राजकीय पदस्थ पदाधिकारी होऊन आपल्या मागण्या आपल्या पदरात पाडून घेतल्या पाहिजेत.