पंतप्रधान आवास योजनेचा लाभ मिळण्यासाठी मोर्चा

पंतप्रधान आवास योजनेचा लाभ मिळावा म्हणून वरणगावातील सिद्धेश्वर नगर येथील नागरिकांनी नगरपरिषदेवर मोर्चा काढला. यावेळी संतप्त महिलांनी जोरदार घोषणाबाजी केली.;

Update: 2021-07-27 11:13 GMT

जळगाव : पंतप्रधान आवास योजनेचा लाभ मिळावा म्हणून वरणगावातील सिद्धेश्वर नगर येथील नागरिकांनी नगरपरिषदेवर मोर्चा काढला. यावेळी संतप्त महिलांनी जोरदार घोषणाबाजी केली. तसेच आपल्या विविध मागण्यांचे मुख्याधिकारी समीर शेख यांना निवेदन दिले.

वरणगावातील सिद्धेश्वर नगर येथे वीस ते तीस वर्षांपासून विविध जाती धर्माचे लोक राहतात. नवीन शासन नियमानुसार अतिक्रमण धारकांना त्यांच्या नावावर सदरची जागा शासनाने मोजमाप करून द्यावी व तिथे राहणाऱ्या गरजू - गरीब लोकांना पंतप्रधान आवास योजनेचा लाभ मिळावा यासाठी माजी नगरसेविका मालाताई मेंढे यांनी वारंवार पाठपुरावा केला. मात्र, शासन-प्रशासनाकडून प्रतिसाद मिळत नसल्याने अखेर शंभर ते दीडशे महिलांनी नगरपरिषदेवर मोर्चा काढला.

यावेळी मुख्याधिकारी समीर शेख यांना निवेदनही देण्यात आले , यावेळी मुख्याधिकारी समीर शेख यांनी त्वरित कार्यवाही करून सिद्धेश्वर येथील रहिवाशांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले त्यानंतर हा मोर्चा मागे घेण्यात आला.

Tags:    

Similar News