पॉप्युलर फ्रंट संघटनेच्यावतीने केंद्र शासनाच्या विरोधात आंदोलन

facebooktwitter-greylinkedin
Update: 2021-10-29 11:17 GMT
पॉप्युलर फ्रंट संघटनेच्यावतीने केंद्र शासनाच्या विरोधात आंदोलन
  • whatsapp icon

औरंगाबाद :औरंगाबाद शहरातील विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आज पॉपुलर फ्रंट संघटनेच्यावतीने केंद्र शासनाच्या विरोधात आंदोलन करण्यात आले आहे, गेल्या काही दिवसापासून मुस्लिम समाजाच्या नागरिकांवर आणि अल्पसंख्यांक नागरिकांवर मोठ्या प्रमाणात अन्याय अत्याचार होत असल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले.

त्रिपुरा येथे विश्व हिंदू परिषदेने काढलेल्या मोर्चा नंतर दंगा भडकला त्यात मुस्लिम नागरिकांचे बळी गेले केंद्र शासनाने गांभीर्याने दखल घेऊन कारवाई करण्याची गरज असताना केंद्र शासन बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप आज आंदोलन दरम्यान पदाधिकाऱ्यांनी माध्यमांशी बोलताना आरोप केला आहे. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन आज विभागीय अधिकारी सुनील केंद्रेकर यांना देण्यात आले आहे.

Tags:    

Similar News