जालन्यातील मोसंबी मार्केट सात दिवस राहणार बंद

Update: 2024-12-31 08:35 GMT

सध्या उत्तर भारतात थंडीची लाट आली आहे.याचा थेट फटका जालन्यातील मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांना बसतोय. उत्तर भारतात थंडी असल्यामुळे मोसंबीची मागणी घटली असून मोसंबीला तीन रुपये ते दहा रुपये किलो इतकाच दर मिळतो आहे. उत्तर भारतासह, कानपूर, बनारस या मार्केटमध्ये देखील जालन्याच्या मोसंबीला विक्रीसाठी अडचणी येत असल्याने आजपासून पुढील सात दिवस मोसंबी मार्केट बंद ठेवण्याचा निर्णय कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनाने घेतला आहे. दरम्यान या सात दिवसात शेतकऱ्यांनी मोसंबी विक्रीस आणू नये असे आवाहन देखील बाजार समिती प्रशासनाने केलं आहे.

Full View

Tags:    

Similar News