दिलासादायक – राज्यात दिवसभरात 61 हजार रुग्ण कोरोनामुक्त, नवीन रुग्णांची संख्या घटली

Update: 2021-05-10 15:47 GMT

कोरोनाच्या गंभीर संकटात सोमवारी जरा दिलासा देणारी माहिती पुढे आली आहे. राज्यात दिवसभरात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या नवीन रुग्णांपेक्षा वाढली आहे. आहे. दिवसभरात ६१ हजार ६०७ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर राज्यात आजपर्यत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ४४ लाख ६९ हजार ४२५ एवढी झाली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८६.९७% एवढे झाले आहे. तर दिवसभरात राज्यात ३७ हजार ३२६ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तर राज्यात दिवसभरात ५४९ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर १.४९% एवढा आहे. राज्यात सध्या ५ लाख ९० हजार ८१८ एक्टिव्ह रुग्ण आहेत.

राज्यातील शहरांमधील परिस्थिती सुधारली

एकीकडे राज्यातील रुग्णसंख्या घटली आहे. तर दुसरीकडे शहरांमधील रुग्णसंख्येतही घट झाली आहे. मुंबईत दिवसभरात 1782 रुग्ण आढळले आहेत. तर 74 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. नाशिकमध्य 1205 रुग्ण आढळले आहेत. तर पुण्यातील रुग्णांची संख्याही घटली आहे. पुण्यातही दिवसभरातील रुग्णसंख्या घटली आहे. पुण्यात 1272 रुग्ण आढळले आहेत. तर नागपूरमध्ये 1441 रुग्ण आढळले आहेत. तर दिवसभरात 18 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर राज्यातील 13 शहरं आणि जिल्ह्यांमध्ये दिवसभरात एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.


Tags:    

Similar News