विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासुन सुरुवात झाली. विरोधकांनी सरकारला धारेवर धरण्याचीही सुरुवात केली आहे. विधानभवनाच्या पायऱ्यांवर घोषणा देत घटनाबाह्य, कलंकीत सरकार म्हणत शिंदे- फडणवीस-पवार सरकारचा निषेध केला. आज काँग्रेस आणि ठाकरे गटाकडून आंदोलन करण्यात आलं. मात्र या आंदोलनाला राष्ट्रवादीचा एकही आमदार उपस्थित नव्हता. यामुळे चर्चेला उधाण आलं आहे.
दरम्यान काँग्रेस आणि ठाकरे गटाचे आमदार आक्रमक झाले असून, सरकारविरोधात विधानसभेच्या पायऱ्यांवर जोरदार आंदोलन करण्यात आले. आमदारांकडून जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. 'कलंकित सरकारचा धिक्कार असो', खोके सरकार हाय हाय अशी जोरदार घोषणाबाजी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या आमदारांकडून करण्यात आली. मात्र या आंदोलनाला राष्ट्रवादीच्या आमदारांनी दांडी मारली. एकही आमदार या आंदोलनात सहभागी झाला नसल्यानं चर्चेला उधाण आलं आहे.