Barkha Dutt यांचं Youtube चॅनेल हॅकर्सनी केलं डिलिट

ज्येष्ठ पत्रकार बरखा दत्त यांनी 4 वर्षांपूर्वी सुरु केलेलं मोजो स्टोरी हे युट्युब चॅनेल हॅकर्सनी डिलिट केलंय. त्यासंदर्भात युट्युबशी बरखा यांच्या टीमनं संपर्क केलाय. मात्र, अजूनही हे चॅनेल रिकवर झालेलं नाहीये.

Update: 2023-06-05 09:12 GMT


NDTV च्या माजी अँकर बरखा दत्त (Barkha Dutt) यांनी चार वर्षांपूर्वी सुरू केलेलं मोजो स्टोरी (Mojo Story) हे युटयुब चॅनेल काही हॅकर्सनी डिलिट केलेलं आहे. या घटनेनंतर बरखा दत्त यांना मोठा धक्का बसलाय. चार वर्ष रक्त, मेहनत, घाम आणि अश्रू गाळत तब्बल 11 हजार व्हिडिओ या युट्युब चॅनेलवर अपलोड करण्यात आले होते. त्यात कोविडच्या तीन वर्षांचाही समावेश होता, ते सर्व गेलं, असं उद्विग्न ट्विटच बरखा दत्त यांनी केलं.

वरिष्ठ पत्रकार असलेल्या बरखा दत्त यांनी मोजो स्टोरी नावानं 4 वर्षांपूर्वी युट्युब चॅनेल सुरू केलं होतं. हॅकर्सनी या युट्युब चॅनेलवरील सर्व कंटेंटच डिलिट केलेला आहे. हॅकर्सनी मोजो स्टोरी चॅनेलचा ई-मेल आयडी आणि युटयुब चॅनेल हॅक केलं. त्यामुळं त्यांच्यासह संपूर्ण टीमला या युटयुब चॅनेलवर कंटेंट अपलोड करता येत नाहीये.

यासंदर्भात चॅनेल डिलिट झाल्यापासून बरखा दत्त आणि त्यांची टीम सतत युट्युबच्या (@TeamYouTube) टीमशी संपर्क साधून दाद मागत आहेत. युट्युबच्या टीमनं बरखा दत्त आणि त्यांच्या टीमला यासंदर्भात कारवाईचं आश्वासन दिलंय. बरखा दत्त पुढे म्हणाल्या, आम्ही युट्युबला कितीवेळा विचारणा केली की हा प्लॅटफॉर्म फ्रीझ करा, जेणेकरून हॅकर्स त्यात बदल करू शकणार नाहीत. 

Tags:    

Similar News