रक्षा खडसे मोदींच्या मंत्रिमंडळात, PMO कडून फोन

Update: 2024-06-09 05:36 GMT

सलग तिसऱ्यांदा जळगाव जिल्ह्यातील रावेर लोकसभा मतदार संघातून भाजप खासदार रक्षा खडसे विक्रमी मतांनी विजयी झाल्या. तिसऱ्यांदा पंतप्रधाम नरेंद्र मोदी पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहे. मोदींच्या तिसऱ्या टर्म मध्ये महाराष्ट्रातून कोणाची वर्णी लागते याकडे लक्ष लागून आहे.

महाराष्ट्रातुन नितीन गडकरी, पियुष गोयल, प्रतापराव जाधव,रामदास आठवले ह्यांना PMO कार्यालयातून फोन आले आहेत तर महिला वर्गात तिसऱ्यांदा रावेर मधून निवडून आलेल्या रक्षा खडसे ह्यांना ही PMO कार्यालयातुन फोन आल्याची माहिती आलीय.

2024 च्या निवडणुकीत मंत्री पदाचे प्रमुख दावेदार असलेले दिग्गज उमेदवार पराभूत झाले आहेत. यात पंकजा मुंडे, डॉ भारती पवार, डॉ हिना गावित ह्यांचा पराभव झाल्याने रक्षा खडसेंच्या वर्णी लागली आहे.

रक्षा खडसे ह्या एकनाथ खडसे यांच्या सून आहेत. रक्षा खडसे यांनी राजकारणाची सुरवात मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी ग्रामपंचायत च्या सरपंच पदा पासून केली आहे तसंच जिल्हा परिषद च्या सदस्य आणि जिल्हापरिषद शिक्षण सभापती पद ही भूषवल आहे. शिक्षण सभापती असतांना जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांना इंग्रजी शिक्षण देण्यावर भर दिला होता. त्यानंतर 2014 मध्ये पहिल्यांदा खासदार झाल्या. 2019 आणि आता 2024 मध्ये महाराष्ट्रात भाजप चं पानिपत होत असतांना रक्षा खडसे पुन्हा तिसऱ्यांदा खासदार झाल्या आहेत.

Tags:    

Similar News