ड्रग्जबाबतच्या कायद्यात मोठा बदल करण्याची तयारी, मोदी सरकार मोठा निर्णय घेणार?

Update: 2021-11-06 07:35 GMT

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणामुळे सध्या NCB आणि ड्रग्ज विरोधी कायदा चर्चेत आलख आहे. पण आता या कायद्यामध्ये मोठा बदल करण्याची तयारीमोदी सरकारने केली आहे, अशी माहिती केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली आहे. धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा वरवाडे नगर परिषद येथे विविध विकास कामांच्या लोकार्पणासाठी केंद्रीय मंत्री रामदास आठवले धुळे दौऱ्यावर आले होते. यावेळी लोकार्पण सोहळ्या दरम्यान आठवले यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे दिली..

ड्रग्स घेणाऱ्याला तुरुंगात टाकू नये, असे मत देखील आठवले यांनी मांडले आहे. ज्याप्रमाणे सिगारेट पिणाऱ्याला व दारू पिणाऱ्याला तुरुंगात टाकले जात नाही, त्याप्रमाणेच ड्रग्स घेणाऱ्याला देखील तुरुंगात न टाकता, त्याला व्यसनमुक्ती केंद्रामध्ये पाठवावे असे आठवले यांनी म्हटले आहे. ड्रग्स घेणाऱ्यांच्या विरोधात सुरू असलेला कायदा बदलण्याच्या विचारात केंद्र सरकार असल्याचा देखील खुलासा या वेळी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केला आहे.

ड्रग्स पार्टी प्रकरणातील मुख्य तपास अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून मंत्री नवाब मलिक यांच्याकडून व्यक्तिगत होत असलेल्या आरोपांचा देखील मंत्री रामदास आठवले यांनी समाचार घेतला. यावेळी आठवले यांनी नवाब मलिक यांनी ड्रग्स संदर्भात आरोप करावेत, परंतु समीर वानखेडे यांच्यावर व्यक्तिगत आरोप करू नये, अशी भूमिका मांडली. नवाब मलिक हे सामील असलेले सरकार हे ड्रग्जला पाठिंबा देणार सरकार आहे. समीर वानखेडेंना NCB ला बदनाम करण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडून सुरू असल्याचा आरोप देखील यावेळी रामदास आठवले केला आहे.

Tags:    

Similar News