#Pegasus : इस्त्रायलकडून मोदी सरकारने केली Pegasus खरेदी, The New York Timesचा गौप्यस्फोट

Update: 2022-01-29 08:11 GMT

Pegasus स्पायवेअर प्रकरणी मोदी सरकारला मोठा धक्का बसला आहे. The New York Times या वृत्तपत्राने याप्रकरणात मोठा गौप्यस्फोट केला आहे. NSO कंपनीने तयार केलेल्या Pegasus Spyware प्रकरणी Newyork Timesच्या वृत्तात अत्यंत गंभीर दावे कऱण्यात आले आहेत. या वृत्तामध्ये भारतासह अनेक देशांनी Pegasus ची खरेदी केल्याचे म्हटले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे Pegasus खरेदीचा करार आणि पंतप्रधान मोदी यांचा २०१७ मध्ये झालेला इस्त्रायलचा दौरा यांचा संबंध असल्याचा दावाही या वृत्तामध्ये करण्यात आला आहे. २०१७मध्ये भारत आणि इस्त्रायल दरम्यान शस्त्रास्त्र खरेदीचा मोठा व्यवहार झाला होता. त्यामध्ये Pegasus खरेदी झाली होती, असे या वृत्तात म्हटले आहे. Pegasus खरेदी करणाऱ्या अनेक देशांची नावे या वृत्तामध्ये देण्यात आली आहेत. यामध्ये भारताची उल्लेख आहे.

गेल्यावर्षी द वायरसह काही आंतरराष्ट्रीय माध्यमांनी Pegasus द्वारे पत्रकार, राजकारणी, सामाजिक कार्यकर्ते यांच्यावर पाळत ठेवली गेल्याचे वृत्त दिल्यानंतर खळबळ उडाली होती. त्यानंतर विरोधकांनी संसदेत हा मुद्दा उपस्थित करत चौकशीची मागणी केली होती. त्यानंतर सुप्रीम कोर्टातही या प्रकरणात याचिका दाखल करण्यात आली होती. कोर्टाने याप्रकरणात चौकशी समिती देखील नेमली आहे. या समितीचा अहवला येण्याआधी आता न्यूयॉर्क टाईम्सच्या वृत्ताने मोठी खळबळ उडाली आहे.

राहुल गांधी यांनी याप्रकरण ट्विट करत मोदी सरकारवर जोरदार हल्ला केला आहे. "मोदी सरकार ने हमारे लोकतंत्र की प्राथमिक संस्थाओं, राज नेताओं व जनता की जासूसी करने के लिए पेगासस ख़रीदा था। फ़ोन टैप करके सत्ता पक्ष, विपक्ष, सेना, न्यायपालिका सब को निशाना बनाया है। ये देशद्रोह है।" या शब्दात केंद्र सरकारवर टीका केली आहे.#Pegasus : इस्त्रायल दौऱ्यात मोदींनीच केला Pegasus खरेदीचा करार, The New York Timesचा गौप्यस्फोट


Tags:    

Similar News