प्रीतम मुंडे, रक्षा खडसे, की डॉ. हिना गावित केंद्रीय मंत्रीमंडळात कोणाची लागणार वर्णी...

Update: 2021-06-16 16:30 GMT

केंद्रीय राज्य मंत्री मंत्रिमंडळाचा विस्तारामध्ये मराठवाड्यातील प्रीतम मुंडे , उत्तर महाराष्ट्रातून रक्षा खडसे आणि डॉ हिना गावित यांच्या पैकी कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. मराठा, ओबीसी आरक्षणाचा वाद सुरू झाला असताना मुंडे भगिनींनी पहिल्यांदाच ठाकरे सरकार वर टीका केली आहे. पंकजा मुंडेंची नाराजी दूर करण्यासाठी आणि ओबीसी समाज भाजप कडे वळवण्यासाठी प्रीतम मुंडे यांच्या नावाचा विचार केला जाऊ शकतो.

भाजप सोडून राष्ट्रवादीचं घडयाळ बांधलेले एकनाथ खडसे यांच्या सून रक्षा खडसें यांच नाव ही मंत्रिमंडळाच्या विस्तारात नाव चर्चेत आहे. खडसेंच्या घरी देवेंद्र फडणवीस यांनी भेट देऊन खडसे फडणवीस यांच्या वादात अंतर कमी करण्याचा प्रयत्न केला.

भाजपवर थेट टीका करणारे एकनाथ खडसे हे सासरे आणि राजकीय गुरू असल्याने रक्षा खडसे यांनी कायम बचावात्मक भूमिका घेत असल्याने मंत्रिमंडळात घेण्याबाबत पक्षातीलच नेते शाशंक आहेत.

नंदुरबार या आदिवासी बहूल जिल्ह्यात भाजपच्या दुसऱ्यांदा झालेल्या खासदार डॉ हिना गावित ह्या आदिवासी समाजाच्या असून भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्याही आहेत. मुद्द्यावर व्यवस्थीत अभ्यासपूर्ण बोलणं तसंच मंत्रिमंडळाच्या विस्तारात सामाजिक बॅलन्स करण्यासाठी डॉ हिना गावित यांचा विचार होऊ शकतो, गावित यांचे ही मंत्रिमंडळात एन्ट्रीसाठी प्रयत्नही सुरू आहेत तसेच नंदुरबार जिल्ह्यात ज्याचा खासदार त्याचा पंतप्रधान असं समीकरण मानलं जातं.

2014 मध्ये डॉ हिना गावित ह्या विजयी झाल्या आणि पंतप्रधान पदी नरेंद्र मोदी विराजमान झाले. तसंच 2019 मध्येही तेच चित्र पाहायला मिळालं. यामुळं नंदुरबार मतदार संघ भाजप महत्वाचा मनाला जातो. त्यामुळं डॉ हिना गावित यांच नाव ही चर्चेत आहे.

या तीन महिलांपैकी कोणाची वर्णी लागते. याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे, कारण या मंत्रीमंडळ विस्तारात पुढील लोकसभा आणि विधानसभा मतदार संघाचं भवितव्य ठरवणार आहे.

Tags:    

Similar News