औरंगाबाद : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद करण्यात आलेले मंदिरं खुली करण्यासाठी मनसे आक्रमक झाली असून मनसेच्या वतीने औरंगाबाद शहरातील सुपारी मारुती मंदिर,गुलमंडी घंटानाद आंदोलन करण्यात आले.
यावेळी ठाकरे सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. एकीकडे सरकारकडून दारूची दुकानं केली जातात, राजकीय नेते सभा, मेळावे घेतात तेंव्हा कोरोना होत नाही का? असा सवाल आंदोलकांनी उपस्थित केला.
यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी मंदिरासमोर आरती करत सरकारच्या धोरणाचा निषेध केला, या आंदोलनात मनसेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.