महेश जाधव यांच्या आरोपानंतर मनसेत राडा

महेश जाधव यांच्या आरोपानंतर मनसेत राडा | MNS rages after Mahesh Jadhav's allegations;

Update: 2024-01-09 12:38 GMT

Navi Mumbai : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पक्षावर एका मनसेच्या पदाधिकाऱ्याने गंभीर आरोप केला आहे. राज ठाकरेंचा पक्ष खंडणीखोर आहे, असा गंभीर आरोप त्यांच्या पक्षातील एका पदाधिकाऱ्याने केला आहे. मनसे नेते अमित ठाकरे यांनीच आपल्याला राजगड येथे बोलवून बेदम मारहाण केल्याचा दावा या पदाधिकाऱ्याने केलाय. महेश जाधव असं या पदाधिकाऱ्याचं नाव आहे. हा पदाधिकारी मनसेच्या मराठी कामगार सेनेचा अध्यक्ष म्हणून काम पाहत होता. महेश जाधव यांनी सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत अमित ठाकरे यांच्यावर मारहाण केल्याचा गंभीर आरोप केला आहे.

या व्हिडीओत महेश जाधव म्हणालेत की “मी महेश जाधव. मी राजगडमध्ये कामागरांची बाजू घेतली म्हणून अमित ठाकरेंनी माझ्यावर हात उचलला. हे ठाकरे आहेत की गुंड आहेत? अमित ठाकरेंसारख्या माणसाला हे शोभत नाही. अमित ठाकरे यांनी माझ्यावर हात उचलला. त्यांना 800 हजार कामगारांचा तयतयाट लागेल”, असं महेश जाधव सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओत म्हणाले आहेत.

महेश जाधव यांच्या या आरोपानंतर नवी मुंबईत मनसेत मोठा राडा झालाय. या व्हिडीओनंतर नवी मुंबईत महेश जाधव समर्थक आणि मनसे कार्यकर्ते आमनेसामने आले आहेत. माथाडी कामगार महेश जाधव यांच्या समर्थनार्थ मेरी कव्हर रुग्णालयाजवळ जमा झाले. याचवेळी मनसे कार्यकर्ते रुग्णालयात येत असताना महेश जाधवांच्या समर्थकांनी मनसे कार्यकर्त्यांना समोरासमोर राडा झाला. एका सोसायटीमध्ये लपायला गेले असता त्या सोसायटीतील सेक्युरी रुमच्या काचा माथाडी कामगारांनी फोडल्या आहेत. दरम्यान मनसे कार्यकर्त्यांनी रुग्णालयातून काढता पाय घेतला.

Tags:    

Similar News