वीजबिलाच्या मुदद्यावर आक्रमक झालेल्या मनसेने आता सक्तीच्या वीजवसुलीविरोधात आपला मोर्चा उघडला आहे. औरंगाबादच्या वैजापूर तालुक्यातील लाडगाव येथील सबस्टेशनवर मनसेच्या कार्यकर्त्यांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलोसांनी त्यांना अडवत ताब्यात घेतले आहे. आधीच नैसर्गिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांची वीज बंद करून त्यांचा छळ करु नका, कारवाई थांबवा अशी मागणी यावेळी मनसेकडून करण्यात आली.