ट्राफिकमध्ये अडकल्याने आमदार येऊ शकले नाहीत - छगन भुजबळांचा दावा

अजित पवारांनी केलेल्या दाव्यापेक्षा आमदार कमी का ? छगन भुजबळ यांनी सांगितले हे कारण;

Update: 2023-07-05 07:45 GMT

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चाळीस आमदार आपल्या सोबत असल्याचे सांगितले होते परंतु मेळाव्यास केवळ २९ आमदार उपस्थित आहेत. अजित पवारांनी दावा केलेले आमदार नक्की गेले कुठे? त्यांच्यासोबत गेलेले आमदार पुन्हा परतले का अशा शंका उपस्थित केल्या जात आहेत. यावर स्वतः छगन भुजबळ यांनी याचे उत्तर दिले आहे. काही आमदार ट्राफिक मध्ये फसलेले आहेत तर काही आमदार आजारी असल्याने मेळाव्यास येऊ शकलेले नाहीत. तर यापैकी काहीजण परदेशात असल्याचा दावा त्यांनी केला आहे. परंतु या आमदारांनी त्यांची प्रतिज्ञापत्रे लिहून दिल्याचे छगन भुजबळ यांनी सांगितले आहे. छगन भुजबळ यांनी केलेल्या दाव्यात किती तथ्य आहे हे स्वतः आमदारांनी स्वतःची भूमिका स्पष्ट केल्यावरच कळेल..

Tags:    

Similar News