एकाच दिवशी दोन परीक्षा, रोहित पवारांचं ट्वीट परीक्षार्थ्यांच्या समस्या सोडवण्याची सरकारला केली विनंती

facebooktwitter-greylinkedin
Update: 2021-10-17 06:10 GMT
एकाच दिवशी दोन परीक्षा, रोहित पवारांचं ट्वीट परीक्षार्थ्यांच्या समस्या सोडवण्याची सरकारला केली विनंती
  • whatsapp icon

पुणे :  सरकारी भरतीसाठीच्या एकाच दिवशी दोन परीक्षांसाठी वेगवेगळ्या जिल्ह्यात परीक्षा केंद्र आल्याने अनेकांना एका परीक्षेला मुकावं लागणार आहे. शासनाने परीक्षा घेणाऱ्या कंपनीला संबंधित अडचण सोडवण्याचे निर्देश तत्काळ द्यावेत आणि मदत केंद्र सुरू करून परीक्षार्थ्यांच्या सोयीनुसार परीक्षा केंद्र रिअलोकेट करावेत. असं कर्जत जामखेडचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत म्हटले आहे.

तसंच कोणत्याही परिस्थितीत ही परीक्षा पुढे ढकलू नये. वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळी फी न घेता प्रत्येक परिक्षार्थ्याकडून एकाच पदाची फी घ्यावी. शिवाय पहिल्या वेळी परीक्षा रद्द झाल्याने आता सर्व परीक्षार्थींना परीक्षेला जाण्यासाठी एसटीचा प्रवास मोफत करायला हवा.अशी मागणी त्यांनी केली आहे.

दरम्यान उमेदवार मोठ्या कष्टाने अभ्यास करतात आणि आई-वडील पदरमोड करुन मोठ्या आशेने मुलांचा खर्च करतात, पण परीक्षा घेणाऱ्या कंपन्या त्यांच्या भविष्याशी खेळतात, हे योग्य नाही. म्हणून कृपया येत्या काळात सर्व परीक्षा MPSC मार्फतच घेण्यात याव्यात, ही कळकळीची विनंती असं रोहित पवार यांनी म्हटले आहे. आमदार रोहित पवार यांनी cmomaharashtra ट्विट टॅग केले आहे.

Tags:    

Similar News