भाजपच्या एकातरी नेत्यावर कारवाई केली का? देशमुखांचा सवाल
MLA Rohit Pawar ED investigation; Former Home Minister Anil Deshmukh's reaction;
राष्ट्रवादी आमदार रोहित पवार यावर ईडी चौकशीवर होत आहे. शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेत रोहित पवार पक्ष कार्यालयातून दक्षिण मुंबईतील बॅलार्ड इस्टेट येथील ईडी कार्यालयात गेले. आमदार रोहीत पवार ईडी चौकशीवर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्र, दिल्ली, बंगालमध्ये विरोधकांना त्रास दिला जातोय रोहित पवारांनी संघर्ष यात्रा काढली, शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडली म्हणूण ही कारवाई केली जात असल्याचं देशमुख म्हणाले आहेत तर भाजपच्या एकतरी नेत्यांवर कारवाई केली का? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे