समीर वानखेडे काय दाऊद इब्राहिम आहे का? नितेश राणे यांचा ठाकरे सरकारला सवाल

Update: 2021-10-24 12:16 GMT

संजय राऊत कुठल्या प्रकारचा गांजा ओढतात हे त्यांना विचारा, कारण तो माणूस शुद्धीत काहीच बोलत नाही. हे समजलं आहे असा टोला नितेश राणे यांनी लगावला आहे.

एनसीबी पकडलेला गांजा भाजपाकडे देते आणि त्या नशेत भाजपा उलटसुलट वक्तव्य करत असल्याचं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं होतं. नितेश राणे यांनी राऊत यांना उत्तर दिलं आहे. रोज सकाळी उठलं की केवळ गांजाच्या गोष्टी करायच्या महाराष्ट्रात दुसरे प्रश्न राहिले नाहीत का? असा सवाल देखील राणे यांनी केला आहे.

शाहरुख खानकडे एवढा पैसा आलाय की त्याने नवाब मलीक आणि संजय राऊतला यासाठीच भाड्याने घेतल्याचं देखील यावेळी नितेश राणे यांनी म्हटलं म्हणाले.

समीर वानखेडेला कोणीही काही करू शकत नाही, करायची हिंमत असेल तर करून दाखवा. पुढचा कार्यक्रम आम्ही करू असा इशारा नितेश राणे यांनी महाविकास आघाडी सरकारला दिला आहे.

भाजपाकडून सचिन वाझेवर कारवाई करण्याची मागणी केली असता, ते काय ओसमा-बीन-लादेन आहे का? असा सवाल मुख्यमंत्र्यांनी केला होता? आता आम्ही म्हणतोय की वानखेडे काय दाऊद इब्राहिम आहे का? असा सवाल आम्ही विचारतोय अशा शब्दात नितेश राणे यांनी महाविकास आघाडी सरकार वर टीका केली आहे.

देगलूर-बिलोली मतदारसंघात प्रचारदरम्यान ते बोलत होते.

Tags:    

Similar News