जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मिशन ऑल आउट; 20 तलवारीसह आरोपी जेरबंद

Update: 2021-10-05 01:50 GMT

जिल्हा परिषदेच्या 11 गट आणि पंचायत समितीच्या 14 जागांसाठी उद्या मतदान होणार असल्याने जिल्हा पोलीस दलाच्या वतीने मोठी कारवाई करण्यात आली आहे. पोलीस विभागाच्या वतीने मोठ्या प्रमाणात नाकाबंदी लावण्यात येऊन जिल्हा भरात मिशन ऑल आउट राबविण्यात आलं.

यावेळी स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने कारवाई करत धडगाव शहरात संशयित रित्या फिरणाऱ्या व्यक्तीला अटक करण्यात आली त्याचाकडून 20 तलवारी जप्त करण्यात आल्या आहेत. पोलिसांच्या या कारवाईने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

दरम्यान या आरोपीची चौकशी करण्यात येत असून जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई हाती घेण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे

Tags:    

Similar News