बेपत्ता मुलींबाबत विरोधकांची माहिती अर्धवट, मॅक्स महाराष्ट्रच्या प्रश्नाला फडणवीस यांचं उत्तर

राज्यात त्रिशूळ सरकार अस्तित्वात आल्यानंतर पहिल्यांदाच सरकार पावसाळी अधिवेशनाला सामोरे जात आहे. त्यापूर्वी विरोधी पक्षाने घेतलेल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून राज्यातील सहा हजार मुली बेपत्ता झाल्याचा आरोप करण्यात आला होता.

Update: 2023-07-16 15:45 GMT

राज्याचे पावसाळी अधिवेशन सोमवापासून सुरू होत आहे. त्यापूर्वी विरोधी पक्षाने केलेल्या आरोपांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले.

राज्यात त्रिशूळ सरकार अस्तित्वात आल्यानंतर पहिल्यांदाच सरकार पावसाळी अधिवेशनाला सामोरे जात आहे. त्यापूर्वी विरोधी पक्षाने घेतलेल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून राज्यातील सहा हजार मुली बेपत्ता झाल्याचा आरोप करण्यात आला होता. याविषयी मॅक्स महाराष्ट्रने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्यातून सहा हजार मुली बेपत्ता झाल्याची माहिती खरी आहे. मात्र बेपत्ता होत असलेल्या मुलींपैकी ९५ टक्के मुली परत येत आहेत. त्यामुळे विरोधी पक्ष अर्धवट माहिती देऊन दिशाभूल करण्याचे काम करत आहे. त्यामुळे विरोधी पक्षाने दिलेल्या माहितीवरून गैरसमज करून घेऊ नयेत. तसेच ज्या ५% मुली बेपत्ता होत आहेत. त्या बेपत्ता मुली आणि इतर महिलांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी शक्ती कायदा करण्यात येत आहे. मात्र या कायद्याला केंद्र सरकारची मंजुरी बाकी आहे. केंद्र सरकारने मंजुरी दिली की लगेच राज्यात कठोर शासन करणारा शक्ती कायदा लागू करण्यात येईल, असं मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.

Tags:    

Similar News