मरणानंतर व्यवस्थेने छळले, तरुणाच्या मृतदेहाला लागल्या मुंग्या

सोलापुरात एक माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आलीय. 20 वर्षीय तरुणाच्या मृतदेहाला शासकीय जिल्हा रुग्णालयात मुंग्या लागल्याचे उघड झाले आहे. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे तरुणाचा झाला मृत्यू नातेवाईकांचा आरोप केला आहे. जिल्हा आरोग्य प्रशासनाने आरोप फेटाळले आहेत.;

Update: 2022-02-14 11:22 GMT

सोलापुरातील बुधवार पेठ येथील राकेश मोरे या 20 वर्षीय युवकावर मागच्या चार दिवसांपासून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये टीबी आजारावर उपचार सुरु होते. मात्र, काल दुपारी साडेतीनच्या दरम्यान राकेश मृत झाल्याची माहिती संबंधित डॉक्टरांनी राकेशच्या नातेवाईकांना दिली.त्यानंतर मृतदेह ताब्यात घेण्यासाठी गेलेल्या नातेवाईकांना एक धक्कादायक प्रकार आढळून आला.

मृत राकेशच्या संपूर्ण शरीराला मुंग्या लागल्या होत्या. राकेशला लावण्यात आलेल्या ऑक्सिजन मास्कला ही मुंग्या लागल्या होत्या.. त्यामुळे राकेशच्या मृत्यूस सिव्हिल हॉस्पिटल मधील डॉक्टरांचा हलगर्जीपणा जबाबदार असल्याचा आरोप राकेशच्या नातेवाईकांनी केला आहे. याबाबत दोषींवर कारवाई व्हावी, यासाठी पोलिसात जाऊन दाद मागणार असल्याची माहिती राकेशच्या नातेवाईकांनी दिली.

मृत व्यक्ती राकेश मोरे याचा मृत्यू साधारण काल दुपारी 3 च्या सुमारास झाला होता. त्यानंतर हॉस्पिटल प्रशासनाकडून नातेवाईकांना कळवण्यात आलं होतं. मात्र, नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास वेळ लावला. दरम्यान, मृत मोरेला टीबीचा त्रास होता आणि तो सर्व शरीरभर पसरलेला होता. यामध्ये मृत शरीराला मुंग्या लागल्या होत्या. त्यासाठी लवकरच सिव्हिल हॉस्पिटल प्रशासन चौकशी समिती नेमणार आहे, असे प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक

डॉ. शाकिरा सावसकर यांनी सांगितले. त्याचबरोबर यापुढून मृतदेह अर्ध्या तासाच्या आत शवगृहात मृत शरीर हलवण्याचा निर्णय हॉस्पिटल प्रशासनाने घेतला असून उपचारामध्ये दिरंगाई झाल्याचा आरोप हॉस्पिटल प्रशासनाने फेटाळून लावला आहे.

Tags:    

Similar News