तुम्हाला जे मिळलं ते घ्या,पण आमच्यातलं कांही घेऊ नका – विजय वडेट्टीवार यांची संभाजीराजेंवर टीका

Update: 2021-08-31 14:31 GMT

सोलापुर मध्ये ओबीसी व्हिजेएनटी संघर्ष समिती च्या वतीने 'ओबीसी निर्धार मेळावा' आयोजित करण्यात आला होता. यावेळी कार्यक्रमाला राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार हे देखील उपस्थित होते. यावेळी भाषण करताना त्यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्दयाला हात घालत संभाजी राजे छत्रपती यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली आहे.

वडेट्टीवार भाषणात म्हणाले, "काही महाराज हे तुमच्यातून द्या असं म्हणाले आहेत, माझं त्यांना एकच सांगणं आहे तुमचं तुम्ही घ्या पण आमच्यातील काही मागू नका. अन्यथा रस्त्यावर उतरू धनगराची काठी घेऊन काय करायचं ते ठरवू... काय व्हायचंय ते होऊ देत." , असे म्हणत त्यांनी संभाजीराजे छत्रपती यांच्यावर नाव न घेताच टीका केली आहे.

याशिवाय बोलताना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातींना एकत्रित घेऊन काम केलं. असं म्हणत प्रतापगडावरील जीवा महालांच्या कामगिरींची आठवण करून दिली. मराठा आरक्षणाचा वाद आधीच चिघळलेला असताना वडेट्टीवारांच्या या वक्तव्यामुळे राज्यात नवा वाद तर उभा राहत नाही ना हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 

पहा काय म्हणाले राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, - 

Full View

Tags:    

Similar News