CET परीक्षेच्या मुद्दयावर मंत्री उदय सामंत आणि शरद पवारांची बैठक

Update: 2021-10-20 08:03 GMT

अकरावी प्रवेशासाठी झालेल्या CET परीक्षेच्या अभ्यासक्रमाच्या शासन निर्णयाविरोधात काही विद्यार्थ्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. याचसंदर्भात काही शिक्षण संस्थांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. या प्रकरणावरच उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी सुध्दा आज बुधवारी शरद पवार यांची भेट घेतली.

याभेटीनंतर माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, "CET परीक्षे संदर्भात अनेक पालकांसमोर विविध अडचणी सध्या निर्माण झाल्या आहेत. जवळजवळ १,०५,००० विद्यार्थ्यांचा हा प्रश्न आहे. १,१०,००० मुलांनी CET परीक्षा दिलेली आहे, त्यातील ३५ विद्यार्थी उच्च न्यायालयात गेले होते. न्यायालयाने या ३५ विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर करू नका असे आम्हाला सांगितले आहे. परंतू न्यायालयाला मी विनंती करतो की ३५ मुलांमुळे इतरांचे वर्ष फुकट जायला नको. याचसंदर्भात चर्चा करण्यासाठी आमची आजची ही आजची बैठक होती."

काय आहे CET परीक्षा प्रकरण?

कोरोना काळात शाळा आणि महाविद्यालये बंद असल्याने सर्व विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण सुरू होते. यामुळे दहावी आणि बारावीच्या परीक्षा देखील ऑनलाईनच झाल्या होत्या. दहावीच्या निकालानंतर विद्यार्थ्यांच्या अकरावी प्रवेशआसाठी CET परीक्षा घेण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता. या परीक्षेसाठी राज्याने SSC बोर्डाचा अभ्यासक्रम निश्चित केला होता. याच निर्णयाविरोधात CBSC आणि ICSC बोर्डाच्या विद्यार्थ्यांना आक्षेप होता आणि त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

Tags:    

Similar News