पेण बलात्कार प्रकरणातील आरोपीला जामीन न देता फाशी द्या: रामदास आठवले

Update: 2021-01-01 14:53 GMT

रायगड - रायगड जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकणाऱ्या पेण येथील 3 वर्षीय चिमुरडीवरील बलात्कार व हत्या प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा द्या अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. रामदास आठवले यांनी शुक्रवारी पीडित कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले, यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.

या पीडित कुटुंबाला प्रधानमंत्री आवास योजना व आदिवासी योजनेतून जलद मदत मिळावी यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे आठवले म्हणाले. लहान मुलींवर;महिलांवर असे अमानुष बलात्कार करून निर्घृण खून करण्याचे प्रकार रोखले पाहिजेत. या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे, मात्र आरोपीला जामीन मिळू नये यासाठी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना पत्र लिहिणार आहे असे आठवले म्हणाले. या प्रकरणी गुन्हेगारावर 6 महिन्यात खटला चालवुन त्वरित फाशी दिली पाहिजे, अशी मागणी रामदास आठवले यांनी केली.

Full View
Tags:    

Similar News